Solapur NCP News: राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

Ajit Pawar News : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे चिरंजीव तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांनी आज (ता. २५) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांच्या गोटात प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाली आहे. आज तर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि त्यांच्या मुलामध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र साठे यांनी आमदार यशवंत माने यांच्यासोबत अजित पवार यांची भेट घेतली त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव जयदीपराजे साठे हेही उपस्थित होते.

Ajit Pawar News
Ahmednagar Politics : आंदोलनातून अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा उमटला आवाज...जिल्हाध्यक्षही आले धावून!

उत्तर सोलापूर तालुक्यातील साठे यांचे वर्चस्व असलेला हा भाग मोहोळ मतदारसंघात येतो. गेल्या वर्षभरापासून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळीही साठे यांच्याबाबत सोलापूरच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, त्यांनी आपण भाजप सोबत जाणार असे कधीही जाहीरपणे सांगितलेले नाही.

Ajit Pawar News
Karnataka Politics News: ना भाजप, ना काँग्रेस; लोकसभा निवडणूक स्बळावर लढणार; जेडीएसने केले स्पष्ट

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावचे उपसरपंच असलेले जितेंद्र साठे यांनी अजित पवार यांची भेट घेणे म्हणजे अजितदादा गटात प्रवेश केल्याचे मानले जात आहे. त्यांनी या गोष्टीला दुजोराही दिला आहे. तालुक्याच्या विकासासाठी आपण अजितदादांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जितेंद्र साठे यांच्या या पवित्र्यामुळे वडील शरद पवार (Sharad Pawar) गटात, तर मुलगा अजित पवारांसोबत अशी विभागणी झाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.