Mahayuti Dispute : ‘रामराजे माढ्यात मदत करणार नसतील, तर बारामतीत सुनेत्रा पवारांना मदत नाही’

Madha Lok Sabha Constituency : माढ्यात रामराजे नाईक निंबाळकर हे विरोधात काम करणार असतील, तर दौंडमधून बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे घेताना दिसत नाहीत.
Ranjitshinh Naik Nimbalkar-jaykumar gore-Rahul kul
Ranjitshinh Naik Nimbalkar-jaykumar gore-Rahul kulSarkarnama

Mumbai, 12 April : माढा लोकसभा मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे माढ्यामध्ये युतीधर्म पाळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे नागपूरकडे खास विमानाने रवाना झाले आहेत.

दरम्यान, माढ्यात रामराजे नाईक निंबाळकर हे विरोधात काम करणार असतील, तर दौंडमधून बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitshinh Naik Nimbalkar-jaykumar gore-Rahul kul
Vanchit Candidate : ‘वंचित’कडून धाराशिवच्या आखाड्यात उतरलेले बार्शीचे आंधळकर कोणाची अडचण करणार?

खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे खास विमानाने नागपूरकडे रवाना झाले आहेत. हे तीनही नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थातच रामराजे निंबाळकर यांच्याकडून महायुतीधर्म पाळला जात नसल्याबद्दल हे तीनही नेते फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक होते. तसेच भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छुक होते. मात्र, महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर मोहिते पाटील यांनी बंड करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. दुसरीकडे रामराजेंनीही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी असहकार स्वीकारला आहे. त्यामुळे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या विशेषतः रामराजेंची तक्रार फडणवीसांकडे करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

Ranjitshinh Naik Nimbalkar-jaykumar gore-Rahul kul
Bawankule On Mohite Patil : मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची नाराजी; ‘मोदींच्या निवडणुकीत राजीनामा देणं योग्य नव्हतं’

माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची ताकद निर्णायक होती. आता खुद्द धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधूही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रामराजे हे युतीधर्म पाळत नसल्याची तक्रार करण्यासाठी खासदार निंबाळकर, आमदार गोरे आणि राहुल कुल हे नागपूरकडे तातडीने रवाना झाले आहेत.

R

Ranjitshinh Naik Nimbalkar-jaykumar gore-Rahul kul
Madha Lok Sabha 2024 : मोहिते पाटलांचं ठरलं; रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश; अर्ज भरायला 16 रोजी पवार सोलापुरात येणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com