Solapur News : ‘निर्भय बनो’ अभियानाची आज (ता. ११ फेब्रुवारी) सोलापुरात कडेकोट पोलिस बंदोबस्तात सभा होत आहे. पुण्यातील सभेवेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, त्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेत सभेसाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. ('Nirbhay Bano' Sabha started in Solapur under police security; Presence of Choudhary, Sarode)
सोलापुरातील या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून सामजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ ॲड असिम सरोदे हे उपस्थित आहेत. पोलिसांनी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून काळजी घेतली आहे. (Nirbhay Bano Solapur Sabha )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यात दोन दिवसांपूर्वी ‘निर्भय बनो’ अभियानाची सभा होणार होती. मात्र, तत्पूर्वीच पत्रकार निखिल वागळे, डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असिम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तो हल्ला भाजप आणि हिंदुत्व संघटनाकडून झाल्याचा आरोप या ‘निर्भय बनो’च्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच, वागळे, चौधरी आणि सरोदे यांनी भाजप विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
पुण्यात हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सोलापुरात ‘निर्भय बनो’ अभियानाची आज दुसरी सभा होत आहे. ती सभा होणार का, सभेला कोण कोण उपस्थित राहणार, याची चर्चा रंगली होती. मात्र, मुख्य वक्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हे कार्यक्रमाला निडरपणे उपस्थित राहिले आहेत.
काही पोलिस हे साध्या गणेवशात बंदोबस्तावर असून त्यांचे कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारीक लक्ष आहे. याशिवाय कडक तपासणी केल्याशिवाय लोकांना या कार्यक्रमासाठी सोडण्यात येत नाही. त्यामुळे पुण्यातील घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.