MLA Gaikwad Firing Update : आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; रणजित यादवला पोलिसांनी घेतले ताब्यात

Police Detained Gaikwad's Driver : आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Ranjit Yadav
Ranjit YadavSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News : भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारप्रकरणी आता नवीन माहिती पुढे आली आहे. आमदार गायकवाड यांच्या गाडीचा चालक रणजित यादव याला ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. (MLA Ganpat Gaikwad's driver Ranjit Yadav was detained by police)

दरम्यान, या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. नवीन काही माहिती हाती लागते का, याची चाचपणी चालकाला ताब्यात घेऊन पोलिस करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. (MLA Gaikwad Firing Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjit Yadav
Sambhaji Raje's Big Statement : संभाजीराजेचं सूचक अन्‌ मोठे विधान, ‘आता माझं महाराष्ट्रापेक्षा देशावर लक्ष’

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आठ दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांनी एका जमिनीच्या वादातून आणि पूर्व वैमनस्यातून उल्हासनगर येथील हील लाईन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये थेट गोळीबार केला होता. या प्रकरणात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. सध्या महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. त्यानंतर तीन तारखेला उल्हासनगर येथील चोपडा कोर्टात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायमूर्ती ए. ए. निकम यांनी गायकवाड यांना बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, हा तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला आहे.

Ranjit Yadav
Crime News : मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी 'ससून'मधून पळाला!

सद्यस्थितीमध्ये गणपत गायकवाड हे पोलिस कोठडीत असून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचा ड्रायव्हर रणजित यादव याला नगर येथून अटक करण्यात आली आहे. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी रणजित यादव यानेच गाडी चालवून गणपत गायकवाड यांना पोलिस ठाण्यात घेऊन आला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असून आमदार गणपत गायकवाड यांनी गाडीतच काही प्लॅन केला होता का? संदर्भात ते गाडीत कोणाशी काही बोलले होते का? या सगळ्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Ranjit Yadav
Tasgaon Assembly Constituency : तासगावात दोन ज्युनिअर पाटील भिडणार ; संघर्षाचा वारसा रोहित आणि प्रभाकर यांच्यात...

गोळीबारवेळी घेतली आमदाराची काळजी

दरम्यान, रणजित यादव हा जवळपास १० वर्षे गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यांचा विश्वासू म्हणून तो ओळखला जातो. ज्या दिवशी घटना घडली, त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी तो वरिष्ठ पाेलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये धावत गेला होता.

Edited By : Vijay Dudhale

Ranjit Yadav
Uddhav Thackeray : घोसाळकरांच्या हत्येनंतर ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; 'सरकार बरखास्त करा अन्...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com