Dhairyasheel Mohite Patil :'माणमध्ये यापुढे नुरा कुस्ती चालणार नाही; ‘वस्ताद’ सर्वांच्या मनातील उमेदवार विधानसभेला देणार आहेत'

Maan NCP : माणमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरू झाली. शरद पवार कोणाला विधानसभेच्या मैदानात उतरवतात, हे पाहावे लागेल.
Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maan, 22 July : देशाच्या राजकारणातील वस्ताद कोण आहेत, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. वस्तादांचे वस्ताद शरद पवारसाहेब आहेत. माण तालुक्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे. इथून पुढे माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही, असा स्पष्ट इशारा माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) अनुषंगाने माणमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) बोलत होते. ते म्हणाले, आगामी काळात माण (Maan) तालुक्यात कसलीच नुरा कुस्ती चालणार नाही. मॅच फिक्सिंग अजिबात चालणार नाही. वस्ताद आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. तुमच्या सगळ्यांच्या मनातला उमेदवार आपले वस्ताद देतील.

दरम्यान, माणमधून तुमच्या मनातील उमेदवार विधानसभेसाठी आपले वस्ताद म्हणजेच शरद पवार देणार आहेत, असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. त्यामुळे माणमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरू झाली. शरद पवार कोणाला विधानसभेच्या मैदानात उतरवतात, हे पाहावे लागेल.

माण तालुक्यातील शासकीय क्रीडा संकुल अर्धवट स्थितीत आहे, वडूजची सुध्दा तशीच अवस्था आहे. देशाला ऑलिंपिक खेळाडू देणाऱ्या माण तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांत एकही क्रीडा संकुल उभे राहू शकलेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मी ठरवलंय दिल्लीच्या अधिवेशनानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन ही क्रीडा संकुल कशी होत नाहीत हे बघायचंय मला, असं आव्हानंही खासदार मोहिते पाटील यांनी स्वीकारले आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होणार? समिती आज निर्णय जाहीर करणार

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माण तालुक्यातील पालक हे अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून क्रीडा क्षेत्रात आपली मुलं पुढं आणत आहेत. पण त्या मुलांना क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक साेयी सुविधा मिळत नाहीत, हे काही बरोबर नाही. पहिलवानांनी इथून पुढे मॅटच्या कुस्तीवर लक्ष केंद्रित करावे. तसेच, महिला कुस्तीगीरांना प्रोत्साहन देवून त्यांच्या मैदानाचे आयोजन करावे.

Edited By : Vijay Dudhale

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Sangola Politics : सांगोल्यात पुन्हा रंगणार भाऊबंदकी...; शहाजीबापूंना डॉ. अनिकेत की बाबासाहेब टक्कर देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com