BJP Political News : '' येत्या 50 वर्षात भाजपला कोणीही हरवू शकत नाही...; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Narendra Modi News : '' पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार...''
Narendra Modi-Amit Shah
Narendra Modi-Amit Shah Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli : आगामी काळात लोकांना आता भाजपशिवाय पर्याय नाही असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी बोलताना सध्या त्यांच्यासारखं काम करणारा देशात दुसरा नेता नाही. पुढील 50 वर्षात भाजपाला कोणीही हरवू शकत नाही असा मोठा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasas Maurya) हे सांगली जिल्ह्यातील तासगाव दौरा केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मौर्य म्हणाले,कारण भाजपा हे वर्तमान आहे आणि भाजप हेच भविष्य आहे. त्यामुळे लोकांनीही भाजपवर विश्वास दाखवला असल्याचं मत त्यांनी बोलून दाखवलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार असल्याचा विश्वासही मौर्य यांनी व्यक्त केला.

Narendra Modi-Amit Shah
Ashadhi Wari Alandi: आळंदीत लाठीचार्ज झालाच नाही; ती तर झटापट, पिंपरीच्या पोलीस आयुक्तांचा दावा !

2024 ला भाजपलाच बहुमत मिळणार...

मौर्य म्हणाले, भाजप(BJP)चे जे विरोधक आहेत, ते आता घाबरले आहेत. कारण नरेंद्र मोदी हे चांगले काम करत आहेत. त्यामुळे विरोधक घाबरून गेले आहेत. त्यामुळे हे सर्व एकजूट होऊन नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र, मोदी 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार आहेत. तर 2024 सालीही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यावेळीही भाजपला बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Narendra Modi-Amit Shah
Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य

मोदींचा करिष्मा हा अजूनही कायम...

या देशाचं काही होणार नाही असं सर्वजण 2014 च्या निवडणुकीच्या आधी म्हणत होते. कारण त्यावेळी हा देश काँग्रेसच्या वर्चस्वाखाली होता. मात्र, त्यावेळी आपण 56 इंचच्या हातात सत्ता दिली. हे भारतात होऊ शकते. कारण नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्वजण एकत्र येत आहेत. मात्र, मोदींचा करिष्मा हा अजूनही कायम असून आगामी काळातही तेच पंतप्रधान होतील असंही उपमुख्यमंत्री मौर्य यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.