Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य

Mumbai Congress News : राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.
Varsha Gaikwad News
Varsha Gaikwad NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress News : राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. लवकरच मुंबई महापालिका निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'मुंबईमध्ये आमच्या जागा वाढवण्यावर भर देऊ, असे त्या म्हणाल्या.

गायकवाड यांनी आज (ता. ११) मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर व चैत्यभूमी येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी गायकवाड म्हणाल्या, ' मला काँग्रेसने दिलेल्या संधीच स्वागत करते. लडकी हूँ, लड सकती हूँ, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणतात. ते सत्यात उतरवत आहे. काँग्रेने महिलांना पुढे नेण्याचे काम केले आहे.

Varsha Gaikwad News
Kalyan-Dombivli politics : भाजप-शिंदे गटाच्या वादात पोलिस निरिक्षक बागडेंचे सॅण्डविच; भाजपने केली ईडी, सीबीआयच्या चौकशीची मागणी

तसेच त्यांनी यावेळी शिंदे सरकारवर टीका केली. या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले आहे. मात्र, महिलांना कोणतीही संधी मिळालेली नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य करताना गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, 'मुंबईत काँग्रेसला पुढे नेऊ. आम्ही आमच्या पक्ष श्रेष्ठींना सांगू. संघटना मजबूत करुन मुंबईमध्ये जागा वाढवण्यावर भर देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाल्या, 'नजीकच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) लोकांनी भरभरून मतदान केले. राज्यातील पोटनिवडणुका असो की कर्नाटक या सगळ्या ठिकाणी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्याचा परिणाम चांगला होईल. आम्ही सोबत लढल्यानंतर आम्हाला कायमच फायदा झाला. त्यामुळे फडणवीस यांना यश मिळेल असे वाटत असेल तर तसे होणार नाही'.

Varsha Gaikwad News
Mumbai Politics News : ठाकरेंच्या खेळीला काँग्रेसचे चोख उत्तर; थेट मुंबईचा अध्यक्षच बदलला अन्...

केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह यांच्या नांदेडमधील भाषणावर भाष्य करताना गायकवाड म्हणाल्या, ''अमित शाह यांनी महागाई, पेट्रोलच्या किंमतीवर बोलल पाहिजे. मूलभूत प्रश्नांवर बोलले पाहिजे. दरवाढ, स्त्रियांची सुरक्षितता यावर शाह यांनी बोलले पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्था लयाला गेली आहे, त्यावर शाह यांनी बोलाव, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.