North Solapur Sabhapati
North Solapur SabhapatiSarkarnama

North Solapur Sabhapati : उत्तर सोलापूरचे सभापतिपद भाजपचे शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे

BJP News: उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी तेजस्विनी अमोल बोराडे तर उपसभापतिपदी सुनील भोसले बिनविरोध निवडले गेले. या निवडीमुळे माजी आमदार दिलीप माने गट पंचायत समितीच्या सत्तेबाहेर राहिला आहे.
Published on

Solapur, 12 March : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे मार्डी गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी अमोल बोराडे यांची, तर उपसभापतिपदी नान्नज गणातून निवडून आलेले भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुनील भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बोराडे या भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार समर्थक असून भोसले हे माजी आमदार यशवंत माने गटाचे आहेत, त्यामुळे तालुक्यातील सर्वांत प्रबळ असलेला माजी आमदार दिलीप माने गट पंचायत समितीच्या सत्तेबाहेर राहिला आहे.

उत्तर सोलापूर पंचायत समितीचे (North Solapur Panchayat Samiti) सभापतिपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्या प्रवर्गाच्या तेजस्विनी बोराडे ह्या मार्डी गणातून निवडून आलेल्या एकमेव सदस्या होत्या, त्यामुळे सभापतिपदी बोराडे यांची निवड निश्चित होती. मात्र, उपसभातिपदाबाबत प्रचंड उत्सुकता होती.

पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) चार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. भाजपकडे बहुमत होते. सभापतिपदाची मार्डी गणाची जागा ही प्रांतिक सदस्य शहाजी पवार गटाकडे जागा वाटपात गेली होती. तेथून तेजस्विनी बोराडे निवडून आल्या आहेत.

नान्नज आणि बीबी दारफळ हे दोन्ही गण माजी आमदार यशवंत माने गटाकडे होते. वडाळा, कोंडी, तिऱ्हे हे तीन गट माजी आमदार दिलीप माने गटाकडे होते. मात्र, वडाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली शिलवंत, कोंडीतून शिवसेनेचे धनाजी भोसले तर तिऱ्हे गणातून ऋतुजा बंडगर निवडून आल्या आहेत, त्यामुळे माजी आमदार दिलीप माने गटाकडे एकच जागा होती.

North Solapur Sabhapati
Pandharpur Sabahapati : मोहिते पाटील समर्थकाच्या मदतीने पंढरपुरात भाजपचा सभापती; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची परिचारकांशी हातमिळवणी

उपसभापतिपदासाठी नान्नजचे सुनील भोसले, बी बी दारफळच्या सुनीता बारसकर आणि पाथरीच्या ऋतुजा बंडगर यांची नावे चर्चेत होती. मात्र, यशवंत माने यांनी भोसले यांच्या नावाला पसंती दिली, त्यामुळे बारसकर यांचे नाव मागे पडले. सभापतिपदी बोराडे, तर उपसभातिपदी भोसले यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे माजी आमदार दिलीप माने गट सत्तेबाहेर राहिला आहे.

North Solapur Sabhapati
Sangli ZP President : सांगली झेडपीचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे? निशिकांत पाटील पडले एकटे, जयंत पाटलांकडून 'टप्प्यात कार्यक्रम'

अडीच वर्षांनंतर दिलीप माने गटाला संधी?

सभापतिपदाचे आरक्षण चक्राकर पद्धतीनुसार अडीच वर्षांनंतर बदलणार आहे, त्यामुळे अडीच वर्षांनंतर ओबीसीसाठी सभापतिपद राखीव राहू शकते, त्या जागेवर माजी आमदार दिलीप माने गटाच्या ऋतुजा बंडगर यांना संधी मिळू शकते, त्याही वेळी उपसभापती कोण होणार, याची उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com