तुझं मुंडकं...; भाजप आमदाराला PFI कडून धमकी

Solapur News| PFI|आयोध्या, काशी, मथुरेतही आमचे सुसाईड बॉम्बर
PFI|
PFI|
Published on
Updated on

PFI threatening letter सोलापूर : देशभरामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातली. तरीही तपास यंत्रणांकडून छापेमारी सत्र अजूनही सुरूच आहे. त्यातच सोलापूरचे भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI च्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मोहम्मद शफी बिराजदार नावाच्या एका व्यक्तीने हाताने लिहीलेले पत्र पाठवत धमकी दिली. या धमकीच्या पत्रात, तुझं मुंडकं धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे. आयोध्या, काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर असून एका दिवसात उडवून दहशत माजवतील.

PFI|
शिक्षक आमदार:भाजपात अर्धा डझन इच्छुक, पण निर्णय गडकरी, फडणवीस, बावनकुळेच घेणार!

याशिवाय, आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर आम्ही मुसलमान आहोत, तुम्ही PFI वर बंदी आणून चुक केली. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार असल्याचा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

यापुर्वी तुम्ही सीमी' वरही बंदी घातली पण त्याचं काय झालं, तुम्ही PFI ला लाख वेळा बंदी घातली तरी आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असंही या पत्रात म्हटल आहे. तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमची मुले गप्प बसणार नाही. घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील, हे लक्षात ठेवा, असा इशाराही या पत्रातून दिला आहे.

हे पत्र मिळाल्यानंतर आमदार देशमुख यांनी तातडीने पोलीस आयुक्तांना भेटून पत्र त्यांच्या हवाली केले आहे. त्यानंतर सोलापूर पोलीस अॅक्शन मोडमध्य आले असून या धमकीचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com