Satara Loksabha : राष्ट्रवादी शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली ; नव्यांना संधी मिळणार...

NCP Sharad Pawar group : कार्यकर्त्यांडून सोशल मिडियावर भावी खासदार असे पोस्टर व्हायरल.
Satyajitsinh Patankar, Sunil Mane, Sarang Patil
Satyajitsinh Patankar, Sunil Mane, Sarang PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजप - शिंदे आणि पवार गटाकडून चढाओढ सुरू असून इच्छुक उघडपणे बोलू लागले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला उमेदवारी मिळणार हे नक्की असून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याने अनेक इच्छुक आपली नावे समोर करू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत तीन तरूण नव्या चेहऱ्यांची नावे समोर आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांडून सोशल मिडियावर भावी खासदार असे पोस्टर व्हायरल होवू लागले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी शरद पवार गटात नव्या इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणाला वाजेल.

Satyajitsinh Patankar, Sunil Mane, Sarang Patil
Nagpur Politics : माझे आयुष्यही नितीन गडकरी यांना मिळो... कोण म्हणालं असं?

अशी परिस्थिती असल्याने पक्षातील इच्छुक आपली इच्छा पक्षाच्या अंतर्गत बैठाकांत व्यक्त करू लागले आहेत. सोशल मिडियावर आणि विश्वासू कार्यकर्त्यांकडे लोकसभेची पेरणी करायची, यावरही एकांतात चर्चा करू लागले आहेत. आता अंतर्गंत चर्चा वाऱ्यासारख्या इकडून - तिकडे फिरू लागल्या आहेत. निवडणुकीला नवीन चेहरा येणार असल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यूहरचना आखण्याबाबत कानोसा घेतला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा आणि कराड अशा दोन भागांचा विचार करून उमेदवार ठरवावा लागणार असल्याने दोन्ही भागातून तीन नावे चर्चेत आली आहेत. शरद पवार गटातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून लोकसभेची तयारी सुरू केली आहे. पदवीधर मतदारसंघात दोन वेळा पराभव झाल्यानंतर आता त्यांनी लोकसभा निवडणूक टार्गेट निश्चित केले आहे.

पक्षाच्या आयटी सेलचे त्यांनी मोठे काम केले असून सातारा जिल्ह्यात वडिलांच्या विकासकामांच्या उदघाटन, शुभारंभाला उपस्थिती लावून गट बांधणी केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधातील विधानसभेचे उमेदवार सत्यजित पाटणकर हेही सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सत्यजित पाटणकर यांचाही पाटण विधानसभा मतदार संघातून दोनवेळा पराभव झाला आहे.

पाटणकर आणि सारंग पाटील हे दोन्ही उमेदवार कराड - पाटण विभागातील आहेत. अशावेळी सातारा विभागातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कराड उत्तर आणि कोरेगाव या दोन मतदारसंघात थेट जनसंपर्क असणारे सुनिल माने हा चेहरा आहे. आता या 3 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की अन्य कोणता नवा चेहरा बाजी मारणार हे रणांगण सुरू झाल्यावर पहायला मिळणार असले तरी तयारी सुरू झाली आहे. 

साताऱ्याच्या विद्यमान खासदारांची भूमिका काय ?

लोकसभेच्या या चर्चांत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील काय भूमिका घेणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यामध्ये खा. पाटील यांनी मागील लोकसभेला वय जास्त झाल्याने निवडणुकीला नकार दिला होता.

मात्र, केवळ शरद पवार यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवून विजय मिळवला. आता वयोमानानुसार पुढील लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले जात असून पुत्र सारंग पाटील यांना संधी दिली जावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. तरीही लोकांकडून पुन्हा विद्यमान खा. पाटील यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे.

(Edited by Amol Sutar)

Satyajitsinh Patankar, Sunil Mane, Sarang Patil
Shivsena Vs BJP : निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्याच्या नावाने फसवी पेन्शन योजना ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com