जतमध्ये अल्पवायीन मुलीचा विनयभंग; वनसाईड लव्हरवर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Sangli Crime News : आटपाडी तालुक्यात एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा लैंगिक आणि मानसिक छळ गावातील चार तरूणांनी केला होता. हा त्रास इतका वाढला की त्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती.
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on
  1. सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील आत्महत्येच्या घटनेने संतापाची लाट उसळली असताना, जत तालुक्यात आणखी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे.

  2. एका वनसाईड लव्हरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  3. या सतत होणाऱ्या घटनांमुळे सांगलीतील पालक आणि समाजमन अस्वस्थ झाले असून मुलींच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Sangli News : सांगली जिल्ह्यात सध्या मुलींची सुरक्षीतता धोक्यात आल्याचे चित्र आहे. काहीच दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यात एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सागलीत संतापाची लाट उसळली असतानाच आता जत तालुक्यात वनसाईड लव्हरवरने अल्पवायीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

काहीच दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यात एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गावातील चार तरूणांनी तिचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी केला होता. तर दोघांपैकी एकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर या नराधरांपैकी एकाने त्या विद्यार्थिनीवर बलात्कार करत तिचा त्या प्रसंगाचा व्हिडिओ तयार केला होता. जो इतर तिघांना दिला होता. याचाच वापर करत तिला वारंवार त्रास दिला जात होता. ज्यानंतर तिने आत्महत्या केली होती. आता चौकशीत 25 हून अधिक अश्लिल व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये सापडल्याचे समोर आल्याने गावातील आणखी किती मुलींना या नराधमांनी छळले असेल अशी शंका उपस्थित केली जातेय.

Crime
Sangli Crime : सांगली सुन्न! बापानेच मुलीचा घेतला बळी, तर 16 वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या; आता पोलिसांची कसोटी

दरम्यान आता जत तालुक्यातील एका गावात अल्पवायीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी काका उर्फ रघुनाथ आमगोंडा कराडे (रा. करेवाडी ति., ता. जत) याच्यावर विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काका उर्फ रघुनाथ आमगोंडा कराडे याने रस्त्यावरून अल्पवायीन मुलगी जात असताना तिचा पाठलाग केला. तिच्यासमोर गाडी आडवी लावून तिला गाडीवर बसविण्यासाठी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिडीत मुलीने उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार सोमवारी (ता. 14) सकाळी अकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी काका उर्फ रघुनाथ खराडे याने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून ‘चल गाडीवर बस’ असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर मुलीने आपल्या घरच्यांना माहिती दिली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी थेट उमदी पोलिस ठाणे गाठत संशयित आरोपी खराडे याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उमदी पोलिस पोलिस उपनिरीक्षक साळवे करत आहेत.

Crime
Sangli Crime : 'डॉक्टर' व्हायचं होतं तिला… पण सराव चाचणीनं केला घोळ! चिडलेल्या बापाची अमानुष मारहाण; 17 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

प्र. जत तालुक्यात नेमकी काय घटना घडली?
उ: एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका वनसाईड लव्हरने केला असून पोलिसांनी त्याच्यावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्र. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे का?
उ: होय, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

प्र. सांगली जिल्ह्यात अशा घटना का वाढत आहेत?
उ: अल्पवयीन मुलींविरोधातील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामागील सामाजिक, मानसिक आणि इंटरनेट-संस्कृतीतील बदल ही काही कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com