Raju Shetti News: ...तरच इंडिया आघाडीत सामील होऊ..; राजू शेट्टींनी घातली 'ही'अट

Swabhimani Shetkari Sanghatana: पुढील दोन दिवस इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निमंत्रण आहे.
Raju Shetty News :
Raju Shetty News :Sarkarnama

Kolhapur Political News: जोपर्यंत इंडिया आघाडी एमएसपीची गॅरंटी घेत नाही, तोपर्यंत इंडिया आघाडीमध्ये सामील होणार नाही. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतलेली दिसते. पुढील दोन दिवस इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निमंत्रण आहे. मात्र शेट्टी यांनी आघाडीत येण्यापूर्वी एमएसपीची अट इंडिया आघाडी पुढे ठेवली आहे. त्यामुळे शेट्टी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशीच शक्यता आहे.

Raju Shetty News :
Ravi Rana News : नवनीत राणांच्या भाजप प्रवेशावर रवी राणांची सावध भूमिका..; आम्ही एनडीएचे घटक...

प्रागतिक विकास मंच यांनी इंडिया आघाडीमध्ये सामील व्हाव, अशी चर्चा प्राथमिक स्तरावर आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झाली होती. त्याला प्रागतिक विकास मंचच्या काही छोट्या पक्षाने संमती दाखवली होती. मात्र शेट्टी यांनी यू टर्न घेत आपली भूमिका बदलली आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही. देशभरातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येऊन एमएसपी गॅरंटी मोर्चा स्थापन केला आहे. जोपर्यंत इंडिया आघाडी याची गॅरंटी घेत नाही. तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही अशी भूमिका शेट्टी यांनी ठेवली आहे.

Raju Shetty News :
Karad NCP News : बाळासाहेब पाटलांचे कराड उत्तरच्या जनतेला आवाहन; फुकटचे श्रेय घेणाऱ्यांपासून सावध रहा

त्यावेळी महाविकास आघाडी कुठे होती?

आठवडाभरापूर्वी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्राथमिक स्तरावर चर्चा केली होती. असे सांगितले होते. 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विकास मंचच्या बैठकीत इंडिया आघाडी सोबत जायचे की नाही? याची घोषणा शेट्टी करणार होते. पण शेट्टी यांनी आता नवीन मुद्दा पुढे आणला आहे. एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडी सोबतचे संबंध तोडल्यानंतर एकाही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. किमान महाविकास आघाडी का सोडली? हे तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारायला हवं होतं. परंतु त्यांच्याकडून संवाद साधला नाही. अशी खंत बोलून दाखवत शेट्टी यांनी जुनं गारुड उकरून काढले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com