ShivSena : ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले; शिवसेनेच्या मंत्र्यांने दिले ऑपरेशन टायगरच्या 2.0 चे संकेत

Prakash Abitkar Operation Tiger 2.0 statement: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आगामी काळात उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा केला.
Prakash Abitkar hints at Operation Tiger 2.0
Prakash Abitkar hints at Operation Tiger 2.0Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : ऑपरेशन टायगर राबवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार आपल्यासोबत घेतले. आता आमदार देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नुकतेच उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे वृत्त आहे. यावर आता खुद्द आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दुजोरा दिला आहे.

यावेळी आबिटकर म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा विश्वास आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आमदार, खासदारांचा शिवसेनेकडे ओढा वाढला आहे. येणाऱ्या काळात अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील, असा दावाही त्यांनी केला.

Prakash Abitkar hints at Operation Tiger 2.0
Mahayuti Government: मंत्रिमंडळात उलथापालथ,शिवसेनेच्या मंत्र्याला डच्चू? शिंदेंच्या कट्टर समर्थकाला लवकरच 'लाल दिवा'? बड्या नेत्याचे संकेत

राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. शाहू महाराज यांच्या विचाराचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कोल्हापूर पासून देशापर्यंत शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेतली जाते. असेही ते म्हणाले.

खासदार संजय दिना पाटील यांच्यावर बोलताना, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, बोलताना काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत. अनावधानाने घडलेल्या घटनेबद्दल संजय दिना पाटील यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असल्याचे स्पष्टीकरण आबिटकर यांनी दिले.

Prakash Abitkar hints at Operation Tiger 2.0
Om RajeNimbalkar: ओम राजेनिंबाळकरांनी शिवसेनेतील अधिकृत प्रवेशापूर्वीच केलेली मागणी समोर; थेट मंत्र्यालाच लावला फोन

अमली पदार्थबाबत बोलताना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण नशा मुक्त अभियान सुरू केलं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. ही समस्या संपूर्ण राज्यभर आणि देशभर आहे. कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा अमली पदार्थ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com