Sanjay Dina Patil News: अरेरावी अन् मारण्याची धमकी भाषा करणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त करताना सगळं काही बोलून गेले

Shivsena News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात आक्रमक होत पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेसह सर्वच कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करताना त्यांची बाजूही मांडली आहे.
Sanjay Dina Patil.jpg
Sanjay Dina Patil.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटले. त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर पाटील गेले काही दिवसांपासून त्यांच्या आक्रमक विधानं, आव्हानाची भाषेमुळे चर्चेत आले आहेत. त्यात भर म्हणजे त्यांनी गुरुवारी (ता.25) पत्रकारांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत थेट मारण्याचीच धमकी दिली. यावर विरोधकांसह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आता संजय दिना पाटलांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात आक्रमक होत पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेसह सर्वच कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करताना त्यांची बाजूही मांडली आहे.

संजय दिना पाटील व्हिडीओमध्ये म्हणतात, ​जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये झालेला आहे, त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दांत आणि शिवीगाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केल्याचं पाटील यांनी म्हणाले.

मात्र, तरीसुद्धा आज सकाळी परत ते पत्रकार मित्र आले होते, मी त्यांना हात जोडून विनंती केली की, बाबा याबद्दल आपण काहीही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं, ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काही बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली, वारंवार मी सांगत आलेलो आहे की बाबा हे सर्व प्रकार हा माझा असल्याचंही त्यावेळी खासदार पाटील यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.

Sanjay Dina Patil.jpg
BJP Politics: ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरेंचे एवढे खासदार फोडल्यानंतरही मोदी-शहांची भीती कायम; भाजप पुढचा डाव कोणावर टाकणार?

खासदार संजय पाटील म्हणाले, तसेच मला आपण जे शिव्या देताय ते ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देताय, त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

तरीसुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्याचं म्हटलं.

Sanjay Dina Patil.jpg
Narayan Rane : 'खासदार गेले आता आमदारही फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; 'त्या पक्षाचा अस्त...' म्हणत ठाकरेंना डिवचलं

माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं, त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले, मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलं असल्याचंही संजय दिना पाटील यांनी नमूद केलं.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कृपा करून आपण मी जे केलंय, मी जो प्रवेश केलाय, त्याच्यासाठी ठीक आहे. पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईला आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा, अशी मी त्यांना विनंतीही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली.

संजय दिना पाटील यांनी उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांनी थेट पत्रकारांवर संताप व्यक्त करताना अरेरावीची भाषा वापरतानाच जीवे मारण्याची धमकीही दिली. तसेच “तुम्ही परत इकडे आलात, तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गांXXX घालताय, परत आले तर मारून. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा,” असे वक्तव्य संजय दिना पाटील यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com