Maharashtra Politic's : राज्यातील 288 पैकी 155 आमदार ‘नॉन ग्रॅज्युएट’; शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी केवळ 133 आमदारांचे मतदान

Teachers’ and Graduates’ constituencies Election : महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 288 पैकी 155 आमदार मतदार नसल्याची माहिती समोर आली. विधान भवनातील सूत्रांनुसार केवळ 133 आमदार पदवीधर असल्याचे सांगण्यात आले आहे.
MLA
MLASarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 24 October : राज्यात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीसाठी शुक्रवारी (ता. २३ जानेवारी) मतदान पार पडले. मतदारासाठी पदवीचे शिक्षण बंधनकारक आहे. निवडणुकीत सर्वच आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला. मात्र, 288 पैकी 155 आमदार या पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी मतदारच नव्हते. राज्यातील विधानसभेचे 133 आमदारच शैक्षणिक पात्रताप्राप्त (पदवी) असल्याची माहिती विधान भवनातील सूत्रांनी दिली.

राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी चुरशीने मतदान झाले. पदवीधरच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर तर, शिक्षक मतदार संघासाठी अमरावती आणि पुणे विभागासाठी निवडणूक झाली. येत्या २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पदवीप्राप्त शिक्षक हे पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या उमेदवारांना मतदान करू शकले. केवळ पदवीप्राप्त असलेल्यांनी आपल्या पक्षाच्या ‘पदवीधर’ उमेदवारांना मतदान केले. राज्याच्या विधानसभेतील २८८ पैकी सर्वाधिक ८२ आमदार सामान्य विषयातून पदवीप्राप्त आहेत. त्याखालोखाल २२ आमदार एलएलबी आणि १७ आमदार अभियांत्रिकीची पदवी घेतलेले आहेत. सहा आमदार डीएड, बीएड उत्तीर्ण असल्याचेही विधानभवनाकडून सांगण्यात आले.

पक्षाच्या आदेशानुसार सर्वच आमदारांनी आपापल्या उमेदवारांचा मतदारांपर्यंत जाऊन प्रचार केला, पण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार या निवडणुकीसाठी मतदार नव्हते. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MLA
Solapur Dcc Bank : सचिन कल्याणशेट्टींनी वाढविले रणजितसिंह मोहिते पाटलांचे टेन्शन; सलग तीन टर्म जिंकलेल्या मतदारसंघाच्या विजयाची चावी भाजप आमदाराच्या हाती

पदवीधर आमदारांची स्थिती

शिक्षणशास्त्र : ०६

एलएलबी : २२

सामान्य पदवी : ८२

वैद्यकीय शिक्षण : ०६

अभियांत्रिकी शिक्षण : १७

एकूण : १३३

MLA
Kolhapur DCC Bank: दुष्काळाचे नाव पण गोकुळच्या निकालाची धास्ती, पराभवातून सावरण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर?

नगरसेवक, सदस्यांसह आमदार, मंत्री प्रचारात

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सदस्यांनी या निवडणुकीचा प्रचार मतदारांच्या घरोघरी जाऊन केला. याशिवाय सर्वच पक्षांचे आमदार, मंत्री देखील प्रचारात दिसले. विशेष बाब म्हणजे 288 मधील 133 आमदारच या निवडणुकीसाठी (पदवीधर) मतदार होते. यात काही मंत्री देखील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com