Pandharpur Wari : कार्तिकी वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान शिंदेंना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

Pandharpur Kartik Wari 2025 : पंढरपुरच्या कार्तिकी वारीत यंदा मोठा इतिहास घडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेत आणखी एक नवी प्रथा सुरू होण्याची शक्यता आहे.
Kartik Vari Vitthal Maha Puja And Eknath Shinde
Kartik Vari Vitthal Maha Puja And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पंढरपूर कार्तिकी वारीसाठी यंदा विठ्ठल महापूजेत बदलाचा प्रस्ताव चर्चेत आहे.

  2. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही सूचना केल्या आहेत.

  3. मंदिर समिती आणि शासन याबाबत अंतिम निर्णय घेणार असून वारकऱ्यांमध्ये याची चर्चा आहे.

Pandharpur News : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीला महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र यावर्षीपासून यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंदिर प्रशासनास केलेल्या सूचनेनुसार यंदा पासून महापूजेत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. यामुळे यंदा पासून कार्तिक वारीला नवी प्रथा सुरू होणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे.

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच यात्रा तयारीचा आढावा घेण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे सह सर्व अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी ही सूचना मंदिर प्रशानाच्या समोर ठेवली.

यावेळी दादा भुसे यांनी, आषाढी वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच जो प्रथम वारकरी असतो त्याला देखील या महापूजेचा मान मिळतो. पण यंदा पासून यात एक महत्वाचा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Kartik Vari Vitthal Maha Puja And Eknath Shinde
Shivsena Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंचा दुसरा नेता अडचणीत, विक्रम नागरेंचा माफीनामा पोलिस स्विकारतील का?

त्यांनी, बैठकीला येतानाच मंत्री प्रताप सरनाईक एक सूचना मांडली. वारकऱ्यासोबतच जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना देखील या महापूजेमध्ये सहभागी करून घेता यावे अशी विनंती त्यांनी केली. याबाबत आता शासन स्तरावर विचार सुरू झाला तसा प्रस्ताव मंदिर प्रशासनाकडे दिल्याचे दादा भूसे म्हणाले.

दोन्ही मंत्र्यांच्या या सूचना जर मंदिर प्रशासनाने स्विकारल्या तर एक नवीन प्रथा यंदापासून सुरू होणार आहे. पण अद्याप याबाबत मंदिर समिती आणि प्रशासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. तर याबाबत कोणता निर्णय होतो याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या महापूजेवरून देखील चर्चांना उधान आले असून दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला संदी मिळणार असा सवाल अनेकांना पडला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाला कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान मिळणार? कोणाच्या हस्ते महापूजा होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावर विधी व न्याय विभागाने मार्गदर्शन करताना कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे यंदाची कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची महापूजा एकनाथ शिंदे करतील. ती पुढील महिन्यात रविवारी (2 नोव्हेंबर) असेल.

Kartik Vari Vitthal Maha Puja And Eknath Shinde
Eknath Shinde : भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याने एकनाथ शिंदे अस्वस्थ, दिल्लीत काय ठरलं?

FAQs :

1. यावर्षी पंढरपूर कार्तिक वारीत काय नवं पाहायला मिळणार आहे?
शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना विठ्ठल महापूजेत सहभागी करण्याचा विचार सुरू आहे.

2. या उपक्रमाची सूचना कोणी केली आहे?
शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही सूचना केली आहे.

3. महापूजेचा मान नेहमी कोणाला असतो?
महापूजेचा मान पारंपारिकरित्या उपमुख्यमंत्र्यांना असतो.

4. या निर्णयाबाबत अंतिम निर्णय कोण घेणार?
मंदिर समिती आणि शासन यांच्याकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

5. वारकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे?
वारकऱ्यांमध्ये या प्रस्तावाबद्दल सकारात्मक चर्चा आणि उत्सुकता पाहायला मिळते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com