Electrol Bond Post : इलेक्ट्रोल बाँडची 'ती' पोस्ट भाजपला झोंबली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा

NCP Sharadchandra Pawar party Vs BJP पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी 'एसबीआय'कडून इलेक्ट्रोल बाँड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणाऱ्या भाजपने इलेक्ट्रोल बाँड देण्यापासून 'एसबीआयला' का रोखले नाही? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाँड महत्त्वाचे वाटले का?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
Electrol Bond NCP Post
Electrol Bond NCP PostSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : इलेक्ट्रोल बाँडवरून भारतीय जनता पक्षाला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. समाजमाध्यमांवर भाजप या मुद्द्यावर सर्वाधिक ट्रोल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्सवरील खात्यावर भाजपविरोधात करण्यात आलेल्या पोस्टवरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. ही पोस्ट डिलीट न केल्यास भाजपने कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharadchandra Pawar party ) एक्स खात्यावर पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा मतदानाचे अपील केले होते. त्याचा व्हिडिओ शेअर करत इलेक्ट्रोल बाँडविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पाकिस्तानी कंपनीने भाजपला (BJP) निधी देण्यासाठी 'एसबीआय'कडून इलेक्ट्रोल बाँड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणाऱ्या भाजपने इलेक्ट्रोल बाँड देण्यापासून 'एसबीआयला' का रोखले नाही? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाँड महत्त्वाचे वाटले का?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Electrol Bond NCP Post
Ambadas Danve News : अंबादास दानवेंना आईची कडक वॉर्निंग; ‘शिंदे गटात गेला तर तुझा अन्‌ आमचा संबंध संपला...’

शरदचंद्र पवार पक्षाच्या समाज माध्यमांवरील खात्यावरची ही पोस्ट सध्या भाव खात आहे. ती प्रचंड वेगाने व्हायरलदेखील होत आहे. या पोस्टची दखल भाजपने त्यांच्या समाजमाध्यमावर रिप्लाय देत कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल जनतेची दिशाभूल करणारी ती पोस्ट डिलीट करून माफी मागावी. तसेच, पोस्ट डिलीट न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

भाजपने कायदेशीर कारवाईच्या इशारानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने यावरदेखील दमदार उत्तर देत शेवटी हा संपूर्ण देश मोदींचा परिवार आहे... त्यामुळेच हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारत आहोत!, असे म्हटले आहे. सक्षम विरोधी पक्ष या नात्याने भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारला प्रश्न विचारण्याचे या लोकशाहीत आम्ही आमचे कर्तव्य समजतो. त्यामुळे कुठल्याही धमक्यांपेक्षा भाजप सरकारने जर त्यांचे कर्तव्य बजावले आणि इलेक्ट्रोल बाँडसंदर्भात पसरलेल्या संभ्रमावर स्पष्टीकरण दिले, तर बरे होईल!, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला 15 मार्चपर्यंत इलेक्ट्रोल बाँडचा डेटा सार्वजनिक करण्याचे आदेश दिला होता. यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 12 मार्च 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात डेटा सादर केला. न्यायालयाच्या सूचनेनुसार, एसबीआयने बाँडशी संबंधित माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रोल बाँडचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केला. यात भाजप एप्रिल 2019 ते जानेवारी2024 या कालावधीत सर्वाधिक 6 हजार 60 कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बाँड स्वरूपात मिळवणारा पक्ष ठरला आहे.

Electrol Bond NCP Post
Girish Mahajan Solapur Tour : दोन वेळा जिंकलेले सोलापूर भाजपच्या ‘संकटमोचका’ने रातोरात का गाठले?

इलेक्ट्रोल बाँडचा तपशील समोर येताच भाजपविरोधक काॅंग्रेससह राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आक्रमक झाले आहेत. समाजमाध्यमांवर भाजप आणि इतर विरोधी पक्षांमध्ये वाॅर रंगला आहे. यात सर्वाधिक आक्रमक राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आहेत.

'जिथे जिथे फक्त मिळेल धन... तिथे तिथे मोदींचे मन... विविध कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रोल बाँडमार्फत मिळणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणारे न्यूमेरिक कोड 'एसबीआय'ने दडवून ठेवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने न्यूमेरिक कोड सादर करण्याचा आदेश दिला. 'एसबीआय' मागे लपणाऱ्या भाजपला चांगलंच फटकारले आहे, असा टोलाही राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपला लगावला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Electrol Bond NCP Post
Paricharak Vs Autade : मंगळवेढा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच आवताडेंच्या फ्लेक्सवरून परिचारक गायब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com