Solapur Air Service : पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपली....सोलापुरातून अखेर प्रवासी विमानसेवेचे ‘टेक ऑफ’

Solapur Political News : ढगाळ वातावरणामुळे सिग्नल मिळत नसल्याने फडणवीस सोलापुरात येऊ शकले नाहीत. मात्र, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत अखेर सोलापूरच्या विमानसेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला.
Solapur Air Service
Solapur Air ServiceSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 June : तब्बल पंधरा वर्षांची प्रतीक्षा आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आज (ता. 09 जून) अखेर सोलापुरातून प्रवासी विमानाचे ‘टे ऑफ’ झाले. सोलापूरच्या विमानसेवेचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येणार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सिग्नल मिळत नसल्याने फडणवीस सोलापुरात येऊ शकले नाहीत. मात्र, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत अखेर सोलापूरच्या विमानसेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला आणि सोलापूरच्या विमानसेवेचे घोडं गंगेत न्हाले.

सोलापूर ते गोवा विमानसेवेला (Air Service) आजपासून सुरुवात झाली. गेली १४ वर्षे १० महिन्यांपासून बंद असणारी सोलापूरची विमानसेवा अखेर आज सुरू झाली. विमानसेवा उद्‌घाटनाची वेळ सकाळी साडेनऊची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा वाजले तरी सोलापूरमध्ये आले नव्हते. त्यामुळे सोलापूरकरांच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. पण केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मोहोळ हे सोलापुरात दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीतच सोलापुरातून विमान सेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमान सेवेचे उद्‌घाटन करण्यासाठी सोलापुरात (Solapur) येण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई विमानतळावर येऊन थांबले होते. विमानसेवेच्या उद्‌घाटनाची वेळ सकाळी साडेनऊची होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना येण्यास उशीर होत असल्याने चलबिचल वाढली होती. मात्र, ढगाळ हवामानामुळे सिग्नल मिळत नसल्याने त्यांचा सोलापूर दौरा अखेर रद्द झाला.

मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर, अभिजीत पाटील, राजू खरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आदींची उपस्थिती हेाती.

Solapur Air Service
Solapur NCP : धक्कादायक; राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या, हे कारण आले पुढे!

गोव्यातील मोपा विमानतळावरून सकाळी प्रवाशांना घेऊन विमान निघाले. ते विमान सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापुरात लॅड झाले. तर सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून प्रवासी विमानाने दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी टेक ऑफ केले, त्यामुळे सोलापूरकरांच्या विमान सेवेचे स्वप्न अखेर साकार झाले.

सोलापूर ते गोवा या 409 किलोमीटर अंतरासाठी प्लाय ९१ या कंपनीच्या विमान तिकिटाचा दर 3,500 ते 5,000 दरम्यान असणार आहे. गोवा येथून सकाळी 7.20 वाजता सोलापूरसाठी विमान उडेल. त्यानंतर 8.30 वाजता सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल. सकाळी 8.50 ला सोलापूरहून तेच विमान गोव्यासाठी उड्डाण घेईल, ते 10.15 वाजता गोवा विमानतळावर उतरणार आहे. सोमवार आणि शुक्रवारसाठी हे वेळापत्रक असणार आहे.

Solapur Air Service
Mohite Patil : भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटलांना डावलले; विमान कंपनीच्या पत्रिकेत मात्र सर्वांची नावे

शनिवार आणि रविवारसाठी गोवा येथून सायंकाळी 4.05 वाजता विमान टेक ऑफ होईल. ते सोलापुरात सायंकाळी 5.10 वाजता लॅंड होईल. त्यानंतर सायंकाळी 5.35 वाजता सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. 6.50 ला गोव्यात विमान लँड होईल, असे फ्लाय ९१ या विमानसेवेचे वेळापत्रक असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com