Saam Exit Poll 2024 : 'मविआ'तील फुटीचा फायदा शंभूराज देसाईंना होणार, पाटणकरांचा कौल कुणाला ?

Shambhuraj Desai benefits from MVA split in Maharashtra elections: पाटण विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत झाली. महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर या विधानसभा मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.
Shambhuraj Desai, Harshad Kadam, Satyajitsinh Patankar
Shambhuraj Desai, Harshad Kadam, Satyajitsinh PatankarSarkarnama
Published on
Updated on

Patan Assembly Election 2024 : पाटण विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत झाली. महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर या विधानसभा मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.

त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोणाचं पारडं जड ठरणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. तर या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हेच पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजयी होऊ शकतात असा अंदाज साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

संपर्क आणि विकासनिधी

शिवसेना (Shivsena) पक्ष फुटीपासून उद्धव ठाकरेंच्या रडारवर असलेले महत्वाचे नाव म्हणजे शंभूराज देसाई. त्यामुळे देसाई यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने चांगली रणनीती या मतदारसंघात आखली आहे. मात्र, तरीही पाटणची जनता पुन्हा एकदा देसाईंच्या गळ्यात आमदारकीची माळ घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shambhuraj Desai, Harshad Kadam, Satyajitsinh Patankar
Kolhapur South Assembly : ऋतुराज पाटलांच्या विजयाचे संकेत? ‘अंडरकरंट’चा शॉक कुणाला?

कारण, सत्तेत मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून त्यांनी पाटणमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे यंदा त्यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. तर शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर यांचेही या मतदार संघात चांगले वर्चस्व आहे.

Shambhuraj Desai, Harshad Kadam, Satyajitsinh Patankar
Karad North Assembly Election : बाळासाहेब पाटील परंपरा कायम ठेवणार, 'साम'चा सर्व्हे काय सांगतो ?

सत्यजितसिंह पाटणकर यांचाही दांडगा जनसंपर्क आहे. मात्र पाटणची जागा शिवसेनेची असल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) इथे अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही. म्हणून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना आडीतील मित्र पक्षांची ताकद मिळू शकलेली नाही. त्यामुळे आघाडीतील फुटीचा फायदा शंभुराज देसाईंना होईल असं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com