Shikhar Pahadia : सुशीलकुमार शिंदेंचा सेलिब्रिटी नातू अखेर सोलापूरच्या मैदानात; युवक काँग्रेसचा विधानसभेसाठी आग्रह

Solapur City Central Constituency : सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे परिवातलाच उमेदवार असला पाहिजे, असा आग्रह आपला राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले.
Sushilkumar shinde- Shikhar Pahadia
Sushilkumar shinde- Shikhar PahadiaSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 September : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेसाठी नाव चर्चेत आलेले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अखेर सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी संपर्क मोहिम सुरू केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीची शक्यता बळावली आहे.

‘सरकारनामा’ने याबाबतचे वृत्त पाच दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतर शिखर पहाडिया (Shikhar Pahadia) हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. युवक काँग्रेसचे सोलापूर (solapur) शहराध्यक्ष गणेश डोंगर यांच्या रामवाडी येथील निवासस्थानी पहाडिया यांनी भेट दिली. तसेच, श्री गणेश मोरया गणपती मंडाळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

शिखर पहाडिया यांचे फेटा बांधून शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी (Solapur City Central Constituency ) आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे परिवातलाच उमेदवार असला पाहिजे, असा आग्रह आपला राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी भेटीनंतर सांगितले. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्याने सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेकांनी दावेदारी आहे.

Sushilkumar shinde- Shikhar Pahadia
Dharmraj Kadadi : ‘दक्षिण’च्या स्वारीसाठी काडादींवर समर्थकांचा प्रचंड दबाव; सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत काय ठरलं?

काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते, याची चर्चा असतानाच आता काही दिवसांपूवी शिखर पहाडिया यांचे नाव सोलापूर शहर मध्य मतदारसंघाठी चर्चेत आले होते. त्यानंतर ते गणेशोत्सवाची संधी साधत सोलापूर शहरात दाखल झाले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर पहाडिया हे चिरंजीव आहेत. शिंदे यांच्या तीन कन्यांपैकी दोघी राजकारणापासून अलिप्त आहेत. मात्र, तिसरी कन्या प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा चालवत आहेत. आता प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा विजय मिळविलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी शिखर पहाडिया यांचे नाव पुढे आले आहे.

Sushilkumar shinde- Shikhar Pahadia
Sanjaykaka Patil : अपरिपक्व माणूस म्हणत विशाल पाटलांच्या ‘त्या’ विधानांचा संजयकाकांनी घेतला समाचार

दरम्यान, शिखर पहाडिया हे 2023 मध्ये सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत सहभागी झाले होते. सोलापूरच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी झाल्याने आजोबा सुशीलकुमार शिंदे यांचा ते राजकीय वारसा चालविणार, अशीही चर्चा त्या वेळी रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com