

Phaltan Politics : प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर फलटण पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादीच्या शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची भाजपच्या पाठिंब्यावर सभापती तर शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी निवड झाली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मोठे हादरे दिले आहेत.
शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर निवडून आल्या आहेत, मात्र निवडीनंतर त्या आपल्याच सभापती असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. त्याचवेळी शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी निवडीनंतर लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांनी शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्याच सभापती असल्याचा दावा केला आहे. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे फलटणचा सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे. उपसभापती पदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची निवड झाली आहे. जिल्ह्यात 6 पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाले आहेत, असाही दावा पाटील यांनी केला.
शिवरूपराजेंचाही राजीनामा :
राष्ट्रवादीचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खर्डेकर यांचे कौतुक केले होते. पंचायत समितीवर भाजपचा सभापती होण्यामागे खर्डेकर यांची कुटनिती असल्याचे निंबाळकर म्हणाले होते. त्यानंतर लगेचच खर्डेकर यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
सकाळीच घेतली होती संजीवराजेंची भेट :
सभापती-उपसभापती निवडीपूर्वी खर्डेकर आणि विक्रमसिंह भोसले यांनी सकाळीच संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती. मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्याच मध्यस्थीने ही भेट झाली होती. त्यानंतरच सत्तेत्री सूत्र फिरली आणि शिवसेनेने केवळ उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.