Pune Gangwar: पुण्यात गँगस्टारच्या भावाची निर्घृणपणे हत्या! आंदेकर, कोमकरनंतर तिसरा 'गेम' गणेश काळेचा; वर्षभरातच 3 मोठे हत्याकांड

Aandekar Vs Komkar Gangwar : पुण्यात टोळीयुध्द पुन्हा एकदा भडकल्याचं दिसून येत आहे. वर्षभराच्या अंतरातच तीन मोठे खून झाले आहेत. एकीकडे पोलिसांकडून गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला जात असतानाच पुण्यासारख्या शहरात गँगवॉरच्या वाढत्या घटनांनी असुरक्षिततेचं,दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Vanraj Aandekar ayush komkar ganesh kale .jpg
Vanraj Aandekar ayush komkar ganesh kale .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुध्द भडकलं आहे. वर्षभरापूर्वी नाना पेठेत झालेल्या वनराज आंदेकरच्या (Vanraj Aandekar) खुनाचा बदला घेत या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर आंदेकर टोळीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्याचा 'गेम' केला होता. आता आयुषच्या हत्येनंतर दोनच महिन्यांत तिसरा गेम झाला आहे. आंदेकर, कोमकरनंतर आता तिसरा गेम गणेश काळेचा झाला आहे. यामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे.

कोंढवा परिसरातील खडीमशीन चौकात शनिवारी (ता.1 नोव्हेंबर) दुपारी गणेश काळेवर एकापाठोपाठ एक अशा सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर गुन्हेगारांनी कोयत्यानं सपासप वार करून गणेशचा निर्घृणपणे खून केला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गणेश काळे हा गायकवाड टोळीतील कुख्यात गुंड समिर काळे याचा धाकटा भाऊ आहे.

गणेश काळे या रिक्षा चालकाची गोळीबार आणि कोयत्यानं वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी फरार झालेत. या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही हत्या आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातूनच झाल्याचं बोललं जात आहे. हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे.

समीर काळे हा टोळीतील नंबरकरी आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे हा मुख्य आरोपीपैकी असून . सध्या पोलिसांनी (Police) त्याला अटक केली असून तो जेलमध्ये आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे याने बंदूक पुरवली असल्याचा देखील पोलीस तपासात उघड झाला आहे.

Vanraj Aandekar ayush komkar ganesh kale .jpg
Pune Politics : पुण्यातून राजकारण फिरणार: दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा; पवारांची राष्ट्रवादी सोबतीला

गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली होती. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने अंत्यसंस्कारादरम्यान शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. याबाबत पोलिसांना देखील माहिती होती. पोलिसांना याची माहिती असूनही त्यांना ही हत्या रोखता आली नाही.

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला गेला होता.

Vanraj Aandekar ayush komkar ganesh kale .jpg
BJP On Satyacha Morcha: ठाकरे बंधूंचा मविआसह धडकी भरवणारा 'सत्याचा मोर्चा',भाजपची पहिली झणझणीत रिअ‍ॅक्शन आली; रवींद्र चव्हाण म्हणाले...

वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर यांच्यासह त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे आंदेकर कुटुंब आणि त्यांची गँग तुरुंगात असतानाही पुन्हा दोनच महिन्यात आता कोमकर कुटुंबाशी संबंधित आणि गायकवाड टोळीतील कुख्यात गुंड समीर काळे याचा धाकटा भाऊ असलेल्या गणेशची भरदिवसा गोळीबार आणि कोयत्यानं हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे याने बंदूक पुरवली असल्याचा देखील पोलीस तपासात उघड झालं आहे.

Vanraj Aandekar ayush komkar ganesh kale .jpg
NCP vs BJP : फडणवीसांनी 'दादा'गिरी मोडीत काढली; माघार घेऊनही मोहोळ ठरले अजित पवारांवर भारी

पुण्यात टोळीयुध्द पुन्हा एकदा भडकल्याचं दिसून येत आहे. वर्षभराच्या अंतरातच तीन मोठे खून झाले आहेत. एकीकडे पोलिसांकडून गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला जात असतानाच पुण्यासारख्या शहरात गँगवॉरच्या वाढत्या घटनांनी असुरक्षिततेचं,दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बंडू आणि कृष्णा हे दोन म्होरके तुरुंगात असूनही आंदेकर टोळी सक्रीय असल्याचं समोर येत असल्यानं पुणे पोलिसांसमोर आता नवं चॅलेंज उभं राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com