Triple Murder Case : मोबाईल सीडीआर, फास्टॅगमुळे शंकर मस्केचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन फसला; पोलिसांनी बांगलादेश सीमेवरच पकडले

Solapur-West Bengal Police joint operation : संपत्तीच्या वादातून तिघांचा खून करणाऱ्या शंकर मस्केला बांगलादेश सीमेवर अटक करण्यात आली. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आहे.
Boramani Triple Murder Case
Boramani Triple Murder Case Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 May : संपत्तीसाठी वहिनींसह पुतण्या आणि पुतणीचा तलवारीने वार करून खून करणाऱ्या शंकर ऊर्फ पप्पू दत्तात्रय मस्के याला सोलापूर आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्तपणे बांगलादेश सीमेवर अटक केली. तो अवैधपणे परदेशात जाण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या माध्यमातून परदेशात पळून जाण्याच्या बेतात होता, त्याच वेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान, शंकर मस्के याला पश्चिम बंगालमधून घेऊन पोलिस पथक आज (ता. ०८ मे) सोलापुरात (Solapur) पोचले. पोलिसांनी मस्केला तातडीने न्यायालयात हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अन्य पाच संशयितांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली.

वडिलोपार्जित जमिनीत मृत पतीचा हिस्सा आणि २५ लाखे रूपये मागत असल्याने शंकर ऊर्फ पप्पू दत्तात्रय मस्के याने शुक्रवारी (ता. २ मे) रात्री घराच्या गच्चीवर झापलेल्या गायत्री सुधाकर मस्के आणि त्यांचा मुलगा शिवराज, तसेच अभ्यासाच्या खोलीत झोपलेल्या प्रियांका यांच्यावर तलवारीने वार करून खून (Murder) केला होता. त्यानंतर तो अलिशान मोटार घेऊन फरार झाला होता.

राणी शंकर मस्के (वय ४५), दीक्षा शंकर मस्के (वय २२), नागेश ऊर्फ धीरज शंकर मस्के (वय २०, सर्व रा. मस्के वस्ती, बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर), सचिन शिवाजी वाघमारे (वय २८, रा. बोरामणी) व सूरज महादेव मोरे (रा. तलमोड, ता. उमरगा, जि. धाराशिव) अशी अन्य संशयितांची नावे आहेत.

Boramani Triple Murder Case
Madha News : 'तुला करणी केलीय, माझ्याकडील कासव घे; तुझ्यावर पैशाचा पाऊस पडतो' : माढ्यात आणखी एका भोंदूला अटक

खून केल्यानंतर आपल्या मोटारीतून शंकर मस्के हा तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल असा सुमारे दोन हजार किलोमीटर प्रवास करून तो बांग्लादेशात जाण्याच्या तयारीत होता. या काळात तो मोबाईलच्या माध्यमातून परराज्यातील मित्रांसोबत संपर्कात असल्याचे दिसून येत होते.

शंकर मस्के हा आपल्या व्यासायिक मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याच्या मोबाईल ‘सीडीआर’वरून स्पष्ट होत होते. त्याचवेळी तो पश्चिम बंगालच्या दिशेने जात होता. मात्र, शंकर मस्के याच्या मोटारीच्या फास्टॅग आणि मोबाईलवरून त्याने परराज्यातील मित्रांशी संपर्क केल्यामुळे त्याचा अचूक ठावठिकाणा पोलिसांना मिळत होता.

तो अवैधपणे परदेशात पाठवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांशीही थेट व मध्यस्थामार्फत संपर्कात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर वेगवान हालचाली करत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बशरीहाट जिल्हा पोलिस अधीक्षक अलकनंदा भोवाल यांच्याकडे मदतीची विनंती केली. त्यांनीही तातडीने सोलापूर पोलिसांच्या मदतीला आपले पोलिस दल दिले, त्यामुळे बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शंकर मस्केला सीमेवरील टाकी (ता. हासनाबाद, जि. उत्तर २४ परगणा) येथील लॉजमधून पोलिसांनी शिताफीने पकडले.

Boramani Triple Murder Case
Sachin Kalyanshetti : सुभाषबापूंप्रमाणे गडकरींनी मलाही पत्र दिलं; पण मी ते मुद्दाम व्हायरल केलं नाही : कल्याणशेट्टींचा नवा दावा

आंतरराज्यीय सहकार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण : अतुल कुलकर्णी

हे प्रकरण महाराष्ट्र पोलिस व पश्‍चिम बंगाल पोलिस यांच्यातील आंतरराज्यीय सहकार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आधुनिक डिजिटल तपास पद्धती, सीडीआर विश्‍लेषण, फास्टॅग वाहन ट्रेकिंग आणि लाईव्ह एलबीएस तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत मुख्य संशयितास बांगलादेश सीमेवर पकडणे शक्य झाले, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com