
Solapur, 13 May : डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी मोठा दावा केला आहे. वळसंगकर रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक बाबींवरून डॉ. वळसंगकर यांना त्रास सुरू होता, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे पोलिसांचा फोकस अजूनही मुसळे माने हिच्यावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, डॉक्टरांचे मित्र पोलिसांचा हा दावा मानायला तयार नाहीत.
दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर (dr. shirish valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असून तिला आज न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. गेली 24 दिवसांत मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आर्थिक कारणांच्या दृष्टीने तपास करण्यासाठी मनीषा हिच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री घरातील बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने (Manisha Musale Mane) हिला १९ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अटकेनंतर पहिले दोन आणि त्यानंतर तीन दिवस ती पोलिस कोठडीत होती.
पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात नव्याने काही पुरावे न मिळाल्यामुळे पोलिसांनी कोठडीचा अधिकार राखून ठेवून 14 दिवस न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी कोठडीचा अधिकार राखून ठेवला पण चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला एकदाही कस्टडीत घेतले नाही.
पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून वळसंगकर हॉस्पिटलवरच तपासाचा फोकस ठेवला आहे. त्यातून काही पुरावे गोळा केले आहेत. डॉ. वळसंगकर यांना मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक बाबींवरूनच त्रास होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या डॉक्टरांनी 17 वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासातून आत्यमहत्या केली असावी, हे त्यांचे मित्रही मानायला तयार नाहीत.
डॉ. शिरीष वळसंगकर यांना कौटुंबीक त्रासाला सामोरे जावे लागत होते, असे त्यांचे मित्र खासगीत सांगतात. त्यामुळे या अंगाने पोलिसांनी तपास केला की नाही, हे न्यायालयात सुनावणीत दिसून येणार आहे. तसेच, मनीषा मुसळे मानेच्या पोलिस कोठडीसाठी नवी आणि भक्कम पुरावे पोलिसांना न्यायालयासमोर ठेवावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.