Thackeray Vs Shinde Group: कोल्हापुरात राजकारण तापलं; बिंदू चौकात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; दोन्ही गटांचा वाद थेट 'बाप्पा'पर्यंत...

Kolhapur Politics : कोल्हापुरात ठाकरे-शिंदे गटात सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
Thackeray Vs Shinde Group
Thackeray Vs Shinde GroupSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापुरात सध्या चांगलंच राजकारण तापलं असून, स्वतःचे अस्तित्व आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुढे आले आहे. राजकीय फायद्यासाठी आता 'बाप्पा'लाही या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी सोडलेलं नाही. दोन्ही गटांचा वाद आता गणेशमूर्तीपर्यंत येऊन पोहाेचला असून, त्याचे पडसाद आज उमटले.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अचानक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. त्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला. ठाकरे गटानेही 'श्रीं'च्या मूर्तीची मिरवणूक काढत मंडपात मूर्ती बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे गटदेखील मंडपासमोर उपस्थित असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठाकरे गटाला बिंदू चौकात अडवले. या वेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

Thackeray Vs Shinde Group
Rahul Narwekar's Delhi Tour : दिल्लीला तातडीने जाण्याचे कारण राहुल नार्वेकरांनीच सांगितले…

संयुक्त शिवाजी चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्ती प्रतिष्ठानाबाबत नेमकं काय घडलं ?

धर्मादाय आयुक्तांची स्वप्निल शिंदे-गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत कार्यकारिणीस मूर्ती प्रतिष्ठापनाबाबत मान्यता दिली. असे असताना शिंदे गटाचे कपिल केसरकर यांनी रात्रीच्या वेळी तिथे गणेशमूर्ती बसवली. त्यामुळे अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांच्यासोबत गुरुवारी आम्हीही वाजतगाजत मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक रवी किरण इंगवले यांनी दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी आक्रमक झाला. त्यासाठी पालखीतून ढोल-ताशाच्या गजरात बिंदू चौकातून मिरवणूक छत्रपती शिवाजी ठिकाणी मार्गस्थ झाली. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून अडवली.

या वेळी ठाकरे गटाने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. "क्षीरसागर यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. विरोधक म्हणून आमच्यावर दबाव टाकत असाल सहन केले जाणार नाही. कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही", असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

Thackeray Vs Shinde Group
Pimpri-Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांना बाप्पा पावला; ३९४ कर्मचाऱ्यांना मिळालं मोठं 'गिफ्ट'

आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, क्षीरसागरांचा इशारा

दुसरीकडे ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करू द्यायची नाही, ही भूमिका शिंदे गटाने घेतली. त्यासाठी मंडपासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

या वेळी बोलताना, कोल्हापुरात प्रत्येक कार्यक्रमात सलोखा बिघडवण्याचे काम एक गुंड करत आहे. अशा पद्धतीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. यातून जो मार्ग निघेल तो ठाकरे गटाने स्वीकारावा, अन्यथा आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. जर शिंगावर येत असतील, तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजेश क्षीरसागरांनी दिला.

दरम्यान, कोल्हापुरातील या संपूर्ण प्रकारामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली असून, दोन्ही गटांच्या हट्टापायी जवळपास दोन तास मुख्य मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही गट पोलिसांना डोकेदुखी ठरले. रोज काही ना काही कारणांवरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे असतात. आता थेट 'बाप्पा'वरूनच राजकारण सुरू झाल्यामुळे दोन्ही गट नागरिकांच्या टीकेचे कारण बनत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Thackeray Vs Shinde Group
Sadabhau Khot News : सदाभाऊंना राग अनावर; मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीसह शिंदे सरकारवरही बरसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.