Prakash Ambedkar : नागपूरमध्ये 'वंचित'चा काँग्रेसला पाठिंबा; पण पटोलेंना आनंद नाही तर दु:ख!

Lok Sabha Election 2024 : डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर आहे, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे हा बडा नेता कोण याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Satara Loksabha News : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कॉग्रेसचा सँडविच झाला आहे. स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालला आहे. तो पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना अंगावर घेऊ शकत नाही. अशा काँग्रेस पक्षाला आम्ही सहकाऱ्याचा हाथ देवू असे स्पष्ट करुन वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे फक्त बाकी आहे, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे हा बडा नेता कोण याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे Satara Lok Sabha Constituency वंचित बहुजन आघाडीचे VBA उमेदवार माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम Prashant kadam यांच्या प्रचारसभेसाठी डॉ. आंबेडकर आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवार कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव शरद गाडे आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात वंचितने माजी सैनिक उमेदवार दिला आहे. कऱ्हाडच्या सभेत मोदी वीस मिनिटे सैनिकांवर बोलले. त्यामुळे आमची ही उमेदवारी भक्कम झाली असून, पंतप्रधानांनाही त्याची दखल घ्यावी लागली, ही जमेची बाजू आहे असल्याचे सांगून डॉ. आंबेडकर यांनी जिल्ह्यात चाळीस हजार माजी सैनिक आहेत. त्यांनी प्रत्येकी दहा मते मिळवली, तरी चित्र काय होऊ शकते? हे दिसून येते असे सांगत वंचितच्या उमेदवारीच्या विजयाचा दावा केला.

Prakash Ambedkar
Sharad Pawar News : 'भेटून, फोनवर आणि खासगीत काय करायचं ते केलंय'; शरद पवारांनी टाकली गुगली

ते म्हणाले, एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस NCP आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये Shivsena सँडविच झालेल्या काँग्रेसला सहकार्याचा हाथ देवू. काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले. यावरून दोन्ही पक्षातील छुपा समझोता उघड झाला असून राज्यात काँग्रेस का लढू शकत नाही, याची कारणेही समोर येऊ लागली आहेत.

दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष होत आहे. मोदींच्या गॅरंटीची जनताच आता खिल्ली उडवत असून नोटबंदी, कर्जवाढ, बेरोजगारी, सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी असल्याचे लोक म्हणत आहेत. मोदींच्या या जुमल्यांना लोकांनी आणि स्थानिक पक्षांनी उध्वस्त करून टाकले आहे. पुण्यातील मोदींच्या सभेत 40 टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. बरेच लोक अर्ध्यातून उठून गेले. यावरून 2014 च्या निवडणुकीतील मोदींचा करिष्मा आता संपत चालला असल्याचेही शरसंधान डॉ. आंबेडकर यांनी साधले.

Prakash Ambedkar
Uddhav Thackeray : केजरीवालांचे नाव घेत भाजप नेत्याचा ठाकरेंना गंभीर इशारा; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com