Shiv Sena News: लोकसभेच्या तोंडावरच ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखानेच साथ सोडली, शिवसेनेत प्रवेश

kalyan politics: चंद्रकांत बोराडे यांच्यावर शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दबाब होता, अशीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती.
kalyan politics News
kalyan politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Kalyan News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Maharashtra Lok Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. ठाकरे गटातील (uddhav thackeray)नेत्यांची गळती अद्यापही थांबलेली दिसत नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे (chandrakant borade) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत (shiv sena) प्रवेश केला आहे. बोराडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण, डोंबिवली, उल्हानगर येथील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत बोराडे यांनी ठाकरेंची साथ सोडली असली तरी त्यांचे लहान बंधू आणि कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे हे शिवसेना ठाकरे गटातच राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

kalyan politics News
Amravati Lok Sabha election 2024: रवी राणा यांनी NDA च्या नेत्यांना भरला दम; नवनीत राणा विरोधात जो काम करेल...

चंद्रकांत बोराडे यांच्यावर शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दबाब होता, अशीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांची कल्याण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती.

उल्हासनगर येथे पप्पु कलानी यांचा दबदबा असताना त्यांनी शिवसेना वाढविण्याचे काम केले. मराठी सिंधी समाजात वाद निर्माण झाल्यानंतर मराठी माणसांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची काम त्यांनी केले. त्यांची पत्नी शीतल बोराडे, आणि भाऊ नगर धनंजय हे नगरसेवक होते. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांचे कुटुंबिय उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com