Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात जोरदार लढाई झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरात सोमवारी (ता. ३ जून) रात्री सातपुते यांच्या विजयाचा बॅनर लावला होता. मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेला बॅनर काढून टाकण्यात आला.
सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते (Ram Satpute) हे विजयी होणार, असे समजून भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील पाणीवेस परिसरात आमदार राम सातपुते यांच्या विजयाचे बॅनर लावले होते. त्यावर हिंदुत्वाचा विजय असेही म्हटले होते. त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीपर्यंत शिंदे ह्या १४ हजार मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, चौथ्या फेरीत ते मताधिक्क्य ३८८४ पर्यंत आले. म्हणजे चौथ्या फेरीपासून आमदार सातपुते यांनी मताधिक्क्य घेण्यास सुरुवात केली होती.
पाचव्या फेरीअखेर राम सातपुते यांना २६८० मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी सातव्या फेरीपर्यंत कायम होती. सातव्या फेरीअखेर राम सातपुते यांना पाच हजार मतांची आघाडी होती. मात्र, सहाव्या फेरीपासून पुढे प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. आठव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांनी १३५९ मतांची घेतली. ती पुढे वाढत गेली आहे. सोलापूरमधील १४ व्या फेरीअखेर प्रणिती शिंदे ह्या ३४ हजार मतांनी पुढे आहेत.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेताच सोलापूर शहरात लावण्यात आलेला आमदार राम सातपुते यांच्या विजयाचा फलक काढून टाकण्यात आला आहे. त्याची जोरदार चर्चा सोलापूर शहरात सध्या सुरू आहे. आता तो बॅनर कोणी लावला होता आणि कोणी काढून घेतला, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.