Solapur Lok sabha Result : प्रणिती शिंदे यांची विजयाकडे वाटचाल; 81 हजार मतांची आघाडी

Lok Sabha Election 2024 : गेल्या दोन निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा झालेल्या पराभवाचा वचपा प्रणिती शिंदे काढण्याच्या मार्गावर आहेत.
Praniti shinde-Ram Satpute
Praniti shinde-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचा विजयरथ रोखताना 81 हजार 621 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. गेल्या दोन निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या मार्गावर प्रणिती शिंदे आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 6 लाख 06 हजार 278 मते मिळाली आहेत. विरोधातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 5 लाख 24 हजार 657 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना 81 हजार 621 मतांनी आघाडी २४ व्या फेरीअखेर घेतली आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही मतदारसंघाचा अंतिम निकाल हा दुपारी तीनपर्यंत हाती येईल, असे सांगितले होते. मात्र, सोलापूरचा निकाला जाहीर व्हायला सायंकाळच्या पावणे सहा वाजल्या आहेत.

प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा २००४ च्या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता. आई आणि वडिलांच्या पराभवाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी वचपा काढला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता.

Praniti shinde-Ram Satpute
Ram Satpute Banner : प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली अन्‌ राम सातपुतेंच्या विजयाचा बॅनर काढला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com