Praniti Shinde : महापालिकेतील पराभवानंतर प्रणिती शिंदेंची कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट; ‘झुकना हमारी फितरत नहीं....’

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या त्सुनामीत काँग्रेस केवळ दोन जागांवर आली. पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना धीर देत भाजपला इशारा दिला आहे.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 January : सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या त्सुनामीत सर्व राजकीय पक्षांचा पालापाचोळा झाला आहे. अनेक वर्षे महापालिकेवर एकहाती सत्ता गाजविणारी काँग्रेस केवळ अस्तित्वापुरती उरली आहे. बहुमताने सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. नामुष्कीजनक पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘झुकना हमारी फितरत नहीं’ असे सांगून त्यांनी सत्ताधारी भाजपला थेट इशारा दिला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने (Congress) महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांसोबत राहून निवडणूक लढवली हेाती. काँग्रेसने ४८ जागा लढवल्या होत्या, त्यात अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. माजी महापौर, माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पक्षाची यंदाच्या निवडणुकीत नीचांकी कामगिरी झाली असून केवळ दोन जागा पक्षाला जिंकता आल्या आहेत.

खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे. तसेच त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला केवळ दोन जागा मिळालेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत झाली आहे. यात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या विजयात त्यांच्या वैयक्तीक संपर्काचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पक्षाला मोठ्या नामुष्कीजनक पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

महापालिकेतील पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या सोलापूरमधील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे सत्य आहे. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या-रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही, याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही.

Praniti Shinde
NCP Politic's : पवारांचा एक खासदार अन्‌ चार आमदारांचे अजितदादांशी गुफ्तगू; झेडपीबाबत झाला मोठा निर्णय

बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणुकांना आपण सामोरे गेलो होतो. तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्या म्हणतात, राजकारणात जय-पराजय हे येत-जात असतात. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते. तुम्ही प्रत्येकाने ज्या जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि न डगमगता काम केले, ते कधीही हरलेले नाही.

हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांचा सूर, बदलतं सामाजिक वास्तव आपण अधिक खोलवर समजून घ्यायला हवं. या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा, यावर चिंतन करायला हवं. सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय असायला हवं.

Praniti Shinde
Mohite Patil : मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय? विजयदादा अन्‌ रणजितदादा भेटले फडणवीसांना, तर धैर्यशील अजितदादांना!

आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ. कारण,

झुकना हमारी फितरत नहीं।

दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने”

तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम!

तुमची

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com