Exit Poll : अजितदादा, बंटी पाटील, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम फेल; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडावर भाजपचा झेंडा

westren Maharashatra Corporation Election 2026 : साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महापालिकांमध्ये भाजप सत्तेवर येणार असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Praniti shinde-vishal patil-vishwajeet kadam- satej patil-Ajit pawar
Praniti shinde-vishal patil-vishwajeet kadam- satej patil-Ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 January : साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार असून एकाही ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकणार नाही, असा साम टीव्हीचा एक्झिट पोल सांगतो. या पोलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, विश्वजित कदमांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील २९ महापालिकांसाठी (Corporation) आज चुरशीने मतदान झाले. मात्र, सर्वाधिक लक्ष मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांकडे लागले होते. कारण या ठिकाणी मोठी चुरस दिसून आली होती. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये विरोधात लढत होते. त्यामुळे मुंबईबरोबरच पुणे, पिंपरी चिंचवडकडे राज्याचे लक्ष होते .

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात महापालिकेच्या 165 जागांपैकी भारतीय जनता पक्ष (BJP) सर्वाधिक ७० जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अजि पवार हे भाजपला धक्का देतील, अशी हवा तयार झाली होती. मात्र, पुण्यात भाजप सत्ता राखून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ५५, शरद पवारांची राष्ट्रवादी १०, शिंदेसेना १२, काँग्रेस ०८, ठाकरे सेना ०५, मनसे ०२ आणि इतरांना तीन जागा मिळण्याचा अंदाज साम टीव्हीच्या पोलमध्ये वर्तविण्यात आलेला आहे, त्यामुळे अजितदादांचे पुण्यात सत्तास्थापनेचे स्वप्न भंगण्याची चिन्हे या पोलनुसार वर्तविली जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई झाली. मात्र, या लढाईत भाजप ७० जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ४२, शरद पवारांची राष्ट्रवादी ०७, शिंदेसेना ०५, मनसे ०२, ठाकरेसेना ०२ असे पक्षीय बलाबल वर्तविण्यात आले आहे, त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सत्ता स्थापन करण्यात अपयश येण्याची शक्यता या पोलनुसार व्यक्त केली जात आहे.

सोलापुरात भाजप ६२ जागा जिंकून सत्तेवर येण्याचा अंदाज सामच्या मतदानोत्तर कलचाचणीत व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर शिंदेसेना १५, काँग्रेस १२, राष्ट्रवादी काँग्रेस ०४, एमआयएम ०३, ठाकरे सेना ०२, शरद पवारांची राष्ट्रवादी एक, तर इतरांना तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप गेल्या वेळीची सत्ता राखणार हे यावरून दिसून येते.

Praniti shinde-vishal patil-vishwajeet kadam- satej patil-Ajit pawar
BJP News : सोलापुरात भाजप पुन्हा बाजी मारणार; 62 जागा जिंकून सत्ता स्थापनेचा दावा करणार,शिंदे सेनेनेही ताकद दाखवली

मागील निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. या वेळी काँग्रेस सर्वाधिक ३४ जागा जिंकणार असल्याचा दावा सामच्या एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला आहे. भाजप २१, शिंदेसेना, १५, राष्ट्रवादी ०७, ठाकरेसेना ०२, तर जनसुराज्य पक्ष ०२ जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. मात्र महायुतीमधील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष हे तीन पक्ष एकत्र येऊन ४५ जागांसह सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

सांगलीत मागील निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली होती. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सांगली महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार हे आता निश्चित झाले आहे. भाजपला सर्वाधिक ३८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०, शिंदेसेना ०४, पवारांची राष्ट्रवादी १० जागा जिंकणार असल्याचा अंदाज मतदानोत्तर कलचाचणीत वर्तविण्यात आलेला आहे.

इचलकरंजी महापालिकेत ३५ जागा जिंकून सत्ता स्थापन करणार, हे आता निश्चित झाले आहे. भाजप ३५, शिंदेसेना ०५, राष्ट्रवादी काँग्रेस ०२, काँग्रेस ०५, शरद पवारांची राष्ट्रवादी १०, तर मॅंचेस्टर आघाडीला ०७ जागा मिळणार, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

Praniti shinde-vishal patil-vishwajeet kadam- satej patil-Ajit pawar
PMC Election : राष्ट्रवादीत आमदारकीचा उधळलेला गुलाल दोनवेळा वाया गेला; आता भाजपमध्ये जाताच नगरसेवकपदाच्या बॅनरता लावण्याचा उतावळेपणा

पश्चिम महाराष्ट्रातील सहापैकी सहा महापालिकांवर भारतीय जनता पक्षाची शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता येण्याची अंदाज सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेला आहे. महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील हे फेल ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार असा अंदाज साम टीव्हीने वर्तविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com