
Kolhapur News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. तसेच त्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेत हे वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली होती. तर त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. अशा प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे कोल्हापूरसह राज्यभरात नाराजीचा सूर उमटत आहे. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. यानंतर त्याच्याविरोधात येथील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या शोधात पोलिसांनी पथ नागपूरला पाठवले असून तो अद्याप फरार आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला अंतरिम दिलासा देताना त्याचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्याला 11 मार्चपर्यंत दिलासा मिळाला असून न्यायालायने त्याला अटक करू नये असे आदेश दिले आहेत. याप्रकरणावर 11 मार्चला पुन्हा सुनावणी होणार असून न्यायालयाने पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान शनिवारी इंद्रजीत सावंत यांची पोलिसांनी या प्रकरणात सात तास चौकशी केली. तसंच, त्यांच्या फोनवर आलेल्या कॉलची फॉरेन्सिक तपासणी केली. ज्यामध्ये सीडीआर’मधून धमकीचा आणि शिवरायांच्या अवमानाचे वक्तव्य करणारा आवाज प्रशांत कोरटकर याचाच असल्याचे उघड झाले आहे. तसंच या ऑडिओ क्लीपमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नसल्याचेही उघड झाले आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलीय.
कोरटकरच्या आक्षेपार्ह विधानामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून राज्यभर निषेध नोंदवला जातोय. तर कोरटकरविरोधात आंदोलन केले जात असून त्याच्या पोस्टरला जोडे मारले जातायत. त्याच्याविरोधात विविध ठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल होत आहेत. अशातच प्रशांत कोरटकरने तो आपला आवाज नसून आपण इंद्रजीत सावंत यांना फोन केलाच नाही म्हणत घुमजाव केला आहे. तर ही ऑडिओ क्लीप फेक असल्याचा दावा देखील त्याने केला होता. पण आता फॉरेन्सिक तपासणीत तो आवाज त्याचाच असल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.