मोठी अपडेट : राज्यात पुन्हा निवडणुकींचा धुरळा! निवडणूक आयोगाच्या हालचालींनी वातावरण तापले; घोषणेकडे लक्ष?

Maharashtra political News : याबाबत निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.
maharashtra election commissioncommission
maharashtra election commissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा बसला आहे. नगरपालिका, महापालिका, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींची लवकरच निवड होणार आहे. त्यातच राज्यसभेच्या सात जागेसाठी होत असलेली निवडणूक जवळपास बिनविरोध होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून सुरु असेलले राज्यातील राजकारण स्थिर होताना दिसत असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

राज्यातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.

बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्याबाबत नवडणूक आयोगाकडून गेल्या काही दिवसापासून तयारी करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर केले जाऊ शकते. या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका या आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहेत.

maharashtra election commissioncommission
Pune BJP : केंद्र सरकारच्या पुण्यातील 'त्या' प्रकल्पाला भाजप नगरसेवकांचा अडथळा, अंतर्गत राजकारणामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याचा धोका

निवडणूक आयोगाकडून लवकरच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या दोन जागांसाठी मतदानाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील बारामती व राहुरी या दोन मतदारसंघात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी केली जात आहे.

maharashtra election commissioncommission
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झाली असून सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार येथून निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या उमेदवारीवर आधीच शिक्कामोर्तब केला आहे.

maharashtra election commissioncommission
NCP leadership : राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीचे संकेत; जय पवारांसह पाच नावांभोवतीच फिरणार राजकारण

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. या जागेवर भाजप घरातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी देत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवणार की नवीन चेहरा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुका केवळ दोन जागांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नसून आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

maharashtra election commissioncommission
congress crisis : शेजारच्या राज्यात सत्तासंघर्ष तीव्र! 'सध्या प्रतीक्षा करू, अन्यथा...'; मुख्यमंत्रिपदाच्या वादात उपमुख्यमंत्र्याचा थेट हायकमांडलाच इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com