Ajit Pawar : अजितदादा, आता तुमचे देव ईडी, सीबीआय, मोदी अन्‌ शाह असतील; शरद पवारांच्या नेत्याची जहरी टीका

Sanjay Kokate Reply to Ajit Pawar : बबनदादांचे विरोधक मंदिरात जातात. ते कामांचे असून त्यांचे विरोधक बिनकामाचे आहेत. होय दादा, आम्ही परमेश्वर आणि घरातील ज्येष्ठ माणसांचा आदर करतो, त्यांना घाबरतो. मंदिरात कोण जातं? ज्यांनी चोऱ्या केलेल्या नाहीत, त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे.
Ajit Pawar-Sanjay Kokate
Ajit Pawar-Sanjay KokateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 September : उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्त माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात बोलताना ‘आमदार बबनराव शिंदेंचे विरोधक मंदिरात जाऊन शपथा घेतात. बबनदादा हे कामांचे आहेत, त्यांचे विरोधक बिनकामाचे आहेत,’ अशी टीका केली होती. त्याला शरद पवार गटाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) यांनी माढ्यात वातावरणनिर्मिती करण्यात यश मिळविले आहे. टेंभुर्णीत झालेल्या अजित पवार यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट महादेव मंदिरात जाऊन माढ्यात एकास एक उमेदवार देण्याची शपथ आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधकांनी घेतली आहे, याचा आपल्या भाषणात उल्लेख केला. त्यावरून शपथ घेण्यासाठी उपस्थित असलेले कोकाटे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले.

बबनदादांचे विरोधक मंदिरात जाऊन शपथा घेतात. ते कामांचे असून त्यांचे विरोधक बिनकामाचे आहेत. होय दादा, आम्ही परमेश्वर आणि घरातील ज्येष्ठ माणसांचा आदर करतो, त्यांना घाबरतो. मंदिरात कोण जातं? ज्यांनी चोऱ्या केलेल्या नाहीत, त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे. तुमचे देव कोण आहेत. ईडी, सीबीआय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तुमचे देव असतील, असा टोलाही संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी अजित पवारांना लगावला.

Ajit Pawar-Sanjay Kokate
Dhangar Reservation : 'मुख्यमंत्रीसाहेब, आपली खुर्ची डळमळीत झाली आहे, तुम्ही धनगरांना आरक्षण दिलं तर...'

ते म्हणाले, मला माझी कुवत माहिती आहे. मी कधीही माढा विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर कधी डोकावत नाही किंवा मोठ्या नेतेमंडळींच्या विरोधात बोलत नाही. पण, आपण इतके खाली आलात की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर बोलायला लागलात. त्यामुळे उत्तर देणं आम्हालाही क्रमप्राप्त आहे.

होय दादा, ती तुमचा कार्यकर्ता होतो, तुम्ही वाघ होता. तुम्ही काल म्हणालात लाथ घालीन तिथं पाणी काढण्याची धमक पाहिजे. होय दादा, मी बघितलेल्या दादांमध्ये ती धमक होती. पण आज ती धमक तुमच्यात नाही. तुमच्यात ती धमक असती तर जेलमध्ये बसला असता. पण आपल्या काकाला फसवून भाजप शिवसेनेकडे गेला नसता. सध्याची लाचारी पत्करली नसती, असा चिमटाही त्यांनी अजित पवारांना घेतला.

Ajit Pawar-Sanjay Kokate
Balasaheb Thorat Video : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? बाळासाहेब थोरातांच्या उत्तराने वाढविला सस्पेन्स...

आज सरकारमध्ये तुमचा झालेला अपमान आम्ही पाहतोय. पण आपण मूग गिळून गप्प बसलेला आहात. सध्या लाथ घालून पाणी काढण्याची धमक तुमच्यात दिसत नाही. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. पण आम्ही कोणाची चोरी केलेली नाही. त्यामुळे आपण बबनदादांची स्तुती करताना त्यांच्या विरोधकांचा अपमान करू नये, हीच आमची अपेक्षा आहे, असेही संजय कोकाटे यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com