Babandada Shinde : शरद पवार गटातील नेत्याच्या ‘त्या’ विधानामुळे बबनदादांबाबतचे गूढ आणखी वाढले...

Sanjay Kokate Statement : तुम्ही काल म्हणालात लाथ घालीन तिथं पाणी काढण्याची धमक पाहिजे. ती धमक पूर्वी तुमच्यात होती. पण आज ती धमक तुमच्यात राहिली नाही. तुमच्या बबनदादांमध्ये तर नाहीच नाही...
Sanjay Kokate-Ajit Pawar-Babanrao Shinde
Sanjay Kokate-Ajit Pawar-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्या माढा मतदारसंघात जनसन्मान यात्रा काढली. या यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत बबनदादांनी आपणही तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, त्यांचे पारंपारिक विरोधक संजय कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर देताना ‘तुम्हाला येत्या पंधरा दिवसांतच कळेल की, माढ्याचा हा दादा कसा आहे,’ असे विधान केल्याने त्यांच्याविषयी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मध्यंतरी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्या वेळी अशीच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला ताकद मिळावी, संबंधित आमदाराच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे, असा संदेश विरोधकांमध्ये जावा, या उद्देशाने राज्यात अजित पवार (Ajit Pawar) हे जनसन्मान यात्रा काढत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावे, असा त्यामागचा उद्देश आहे. ती जनसन्मान यात्रा रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यातून काढण्यात आली होती.

टेंभुर्णी येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी ‘बबनदादांचे (Babanro Shinde) विरोधक मंदिरात जाऊन एकास एक उमेदवार देण्याबाबत शपथा घेतात. ते कामांचे असून त्यांचे विरोधक बिनकामाचे आहेत,’ अशी टीका केली होती.

त्या टीकेला आज शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले आम्ही मंदिरात गेलो हे खरे आहे. पण मंदिरात कोण जातं? ज्यांनी चोऱ्या केलेल्या नाहीत, त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे.

Sanjay Kokate-Ajit Pawar-Babanrao Shinde
Ajit Pawar : अजितदादा, आता तुमचे देव ईडी, सीबीआय, मोदी अन्‌ शाह असतील; शरद पवारांच्या नेत्याची जहरी टीका

‘तुमचे बबनदादा, किती कामाचे आहेत, हे सगळ्या तालुक्याने बघितलेले आहे. फक्त आता तालुका विकायचाच राहिलेला आहे. मी कधीही माढा विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर डोकावत नाही किंवा मोठ्या नेतेमंडळींच्या विरोधात कधी बोलत नाही. पण, आपण इतके खाली आला आहात की आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलायला लागला. त्यामुळे आम्हाला उत्तर देणं भाग पडलं आहे, असेही कोकाटे यांनी सांगितले.

तुम्ही काल म्हणालात लाथ घालीन तिथं पाणी काढण्याची धमक पाहिजे. ती धमक पूर्वी तुमच्यात होती. पण आज ती धमक तुमच्यात राहिली नाही. तुमच्या बबनदादांमध्ये तर नाहीच नाही...

आणि हो, तुमच्या दादांनी काल घड्याळाचं नावसुद्धा घेतलं नाही. ज्याला उभं करायचं आहे, त्याला (माढ्यातून बबनराव शिंदे यांच्या चिरंजीव रणजित शिंदे यांची उमेदवारी खुद्द बबनदादांनी घोषित केली आहे) स्टेजवरसुद्धा आणलं नव्हतं. तुम्हाला येत्या पंधरा दिवसांतच कळेल की माढ्याचा हा दादा कसा आहे, असा दावा केला आहे.

आमची तुम्हाला विनंती आहे की, इतरांविषयी विचार करून बोला. आम्ही सामान्य कार्यकर्ते असू पण आम्ही कोणाची चोरी केलेली नाही. त्यामुळे बबनदादांची स्तुती करताना त्यांच्या विरोधकांचा अपमान करू नये, हीच आमची अपेक्षा आहे, असेही कोकाटे यांनी म्हटले आहे.

Sanjay Kokate-Ajit Pawar-Babanrao Shinde
Dhangar Reservation : 'मुख्यमंत्रीसाहेब, आपली खुर्ची डळमळीत झाली आहे, तुम्ही धनगरांना आरक्षण दिलं तर...'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता संजय कोकाटे यांनी पुन्हा बबनदादांबाबत विधान केल्याने पुन्हा एकदा बबनराव शिंदेंबाबत गूढ पुन्हा वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com