Sangola Politic's : गणपतराव देशमुखांसोबत काम केलेले शेकापचे मातब्बर भाजपच्या गळाला; लवकर पक्षप्रवेश, पालकमंत्र्यांचे संकेत

PWP Party Leader Attend on BJP's platform : सांगोल्यातील शेकापच्या नेत्यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे शेकापच्या कलाने चालणारे सांगोल्याचे राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता आहे.
PWP-BJP
PWP-BJPSarkarnama
Published on
Updated on

Sangola, 20 May : भाजपचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम विभाग) चेतनसिंह केदार-सावंत यांचा पदग्रहण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चित्रा वाघ, माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सापुते आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला. भाजपच्या या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाच्या जुन्या जाणत्या नेतेमंडळींनी हजेरी लावली. विधानसभेच्या निकालानंतर शेकापमधील दिग्गज आणि (स्व.) गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम केलेले मातब्बर मंडळी भाजपच्या व्यासपीठावर दिसून येत आहेत. या नेत्यांची भाजपची सगली वाढली असून काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे ही शेकापसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.

भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आणि सत्कार समारंभाचा सांगोल्यात कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास अपेक्षेनुसार पालकमंत्री गोरे, माजी खासदार निंबाळकर, माजी आमदार सातपुते हे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, त्या कार्यक्रमाला सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षातील मातब्बर नेतेमंडळींनी हजेरी लावली. शेकापची काही ज्येष्ठ मंडळी ही भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होती, त्यामुळे गणपतराव देशमुखांनी उभी केलेली ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर कशी? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

शेकापच्या (PWP) जुन्या नेत्यांनी भाजपच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी म्हणजे वैचारिक संक्रमणाची सुरुवात मानली जात आहे. नव्या राजकीय प्रवाहासोबत जोडून घेण्याची तयारी धर्मनिरपेक्षतेचा जप करणाऱ्या कार्यकर्त्यांची असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. तब्बल अकरा वेळा निवडून आलेले (स्व.) गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांसोबत काम केलेले शेकापचे काही जुने शिलेदारही आता भाजप विचारसरणीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे सांगोल्यात शेकापच्या आगामी वाटचालीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनाही प्रथम सांगोल्यावर (Sangola) लक्ष केंद्रीत केले आहे. दोघांचाही सांगोल्याशी नित्य संपर्क असतो, त्यामुळे काही माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आता थेट जय श्रीराम म्हणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. स्थानिक कार्यक्रमांबरोबरच मुंबईतही गाठीभेटी होत आहेत, त्यामुळे शेकापचे नेते आणि भाजपशी जवळीकता वाढताना दिसत आहे.

PWP-BJP
Solapur Congress : माजी मंत्र्यांचा नकार; पण सोलापूर काँग्रेसला 15 दिवसांत मिळणार नवा 'कॅप्टन', ही आठ नावे हायकमांडला पाठविणार

भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. इतर पक्षातील नेतेमंडळीही भाजपसोबत येण्यास इच्छूक आहेत. येत्या काही दिवसांत ते भाजपत येतील, असे सांगून पालकमंत्री गोरे यांनी नव्या घडामोडींचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सांगोल्यातील शेकापच्या नेत्यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे शेकापच्या कलाने चालणारे सांगोल्याचे राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता आहे.

PWP-BJP
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेत्याचा पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; म्हणाले, ‘सत्य लपविण्याचा...’

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 768 मतांनी हुकलेली आमदारकी या वेळी महायुतीची लाट असूनही शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला. कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, सूत गिरणी आदी सत्तास्थाने असूनही शेकापचे जुने नेते आणि कार्यकर्ते भाजपकडे का आकृष्ट होत आहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ शेकापवर आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com