Builder Suicide Case : "फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले"; बिल्डर आत्महत्या प्रकरणात कट्टर विरोधकाचा धंगेकरांवर हल्लाबोल

ganesh bidkar slams ravindra dhangekar Over Pune Builder Khalil Sheikh Suicide Case : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर अडचणीत आले आहेत.
Pune Builder Suicide Case; ganesh bidkar and ravindra dhangekar
Pune Builder Suicide Case; ganesh bidkar and ravindra dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्याप्रकरणात माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या सह 14 जणांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती. यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे, भाजपाचे माजी नगरसेवक रघू गौडा यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते.

यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस सध्या या सर्वांचा शोध घेत आहे. या प्रकरणावर भाजप नेते आणि धंगेकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असणारे गणेश बिडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहेत.

बिडकर म्हणले, "सलील शेख यांचा जो दुर्दैवी मृत्यू झालाय, तो निश्चितच निंदनीय आहे. तो ज्या पद्धतीत झाला, ज्या परिस्थितीत झाला, त्याचा अभ्यास समाजातल्या प्रत्येक घटकाने केला पाहिजे. आणि जे जे कोणी आपल्याला स्वतःला या समाजातले प्रमुख मानतात, त्यांच्यासाठी तर हा निश्चितपणे धडा मिळेल.

Pune Builder Suicide Case; ganesh bidkar and ravindra dhangekar
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? शेख कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; कडक कारवाईचे आश्वासन

या संदर्भात पोलिसांची १३ पथकं या ठिकाणी शोधतायत. आणि जे कोणी मोठे पदाधिकारी, स्वयंभू नेते होते, ते आज भूमिगत झालेत ही निंदनीय गोष्ट आहे, याचा मी निषेध करतो. खरं तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ही या संदर्भातल्या सर्व जे आरोपी आहेत त्यांनी दाखवायला पाहिजे होती, त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती, अशा वेळेला पळून जाणं ही निश्चितच चांगली गोष्ट नाही.

कोर्ट, पोलीस, कायदेशीर प्रक्रिया चालू राहील. पण यातनं या लोकांचा छोटेपणा निश्चितपणे समाजापुढे आलेला आहे. आणि समाजाला हे कळून गेलंय की हे अत्यंत छोट्या मनाचे आणि भित्रे माणसं आहेत, यांच्यात परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही.

पथकं तयार आहेत. जे कोणी या ठिकाणी फरार झालेत, ती सगळी मोठी आणि हुशार लोकं आहेत आणि त्यामुळं किती दिवस कायद्याला चकवतील हे सांगता येत नाही. परंतु ही प्रक्रिया चालू राहील. परंतु त्यांचा जो छोटेपणा आहे हा समाजापुढे आलाय आणि त्यांनी पळून जाणं ही निश्चितच चांगली घटना नाही. त्यांनी या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे होतं. जर का ते निश्चितपणे म्हणतात आम्ही त्यात नव्हतो, तर त्यांनी या गोष्टीला सामोरं जाऊन त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती.

बिडकर पुढे म्हणाले, मला नाव घ्यायची इच्छाही नाही, माझा तो स्वभावही नाही. पण जे जे कोण स्वयंभू नेते होते, रोज लोकांवर बोटं दाखवत होते हाताची पायाची जेवढी आहेत तेवढी, आज त्यांच्यावरच ती बोटं उठली आहेत. आज त्यांना समाजात तोंड लपवून फिरावं लागतंय, याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.

Pune Builder Suicide Case; ganesh bidkar and ravindra dhangekar
Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर अडचणीत; बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आज तुम्ही उठसूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलत होतात आणि आज आपल्याला तोंड काळं करून पळावं लागतंय याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. आपण या घटनेला जर का सामोरं गेला असता, पोलिसात गेला असता, कोर्टाला सामोरं गेला असता, त्या कुटुंबाबरोबर उभे राहिला असता ज्या कुटुंबाबरोबर तुमचे गेले २५ वर्षांचे संबंध आहेत. अशा काळात तुम्ही तोंड काळं करून पळालात, हे निश्चितपणे तुमचं जे व्यक्तिमत्त्व आहे अशी बिडकर येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com