Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? शेख कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; कडक कारवाईचे आश्वासन

Khalil Sheikh Suicide, Ravindra Dhangekar, Pune Suicide Case: बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्याप्रकरणी कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत खलील शेख यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्याप्रकरणी दोषींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
Ex MLA Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Khalil Sheikh Suicide: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना अटक व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शेख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात, खलील शेख यांच्या पत्नी सुलताना शेख आणि कुटुंबियांनी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथील कार्यक्रमदरम्यान, फडणवीस यांची भेट घेतली.

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गुरूवार (ता.१६) भागीदारांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट आणि काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते, ज्यात त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली. या नावांमध्ये पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर, त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर व इतर १२ जणांची नावे होती. या १४ जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत खलील शेख यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्याप्रकरणी दोषींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
Maharashtra News Live Update: खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींना अटक व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शेख कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी शेख यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेत याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुढील काही तासांतच माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर दोषींना अटक होण्याची शक्यता आहे.

या आत्महत्या प्रकरणा १४ जणांवर गुन्हा दाखल होऊनही आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदाराचे नाव असतानाही अटक का झाली नाही, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "पोलिसांनी या संदर्भात एफआयआर दाखल केला असून पोलीस योग्य तीच कारवाई करतील. या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही. जी कायदेशीर कारवाई आवश्यक आहे, ती पोलीस करतील, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत खलील शेख यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्याप्रकरणी दोषींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
Maharashtra Politics Live Update : 'देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर' : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

नेमका वाद काय होता?

खलील शेख हे उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीमध्ये भागीदार होते. लक्ष्मी रोडवरील वक्फ बोर्डाच्या एका जागेवर पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू होता. मात्र या जागेला कायदेशीर स्थगिती मिळाल्याने काम रखडले आणि शेख यांच्यावर बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले. शेख यांच्या आरोपानुसार या काळात भागीदार त्यांचे सुमारे ५० लाख रुपये देण्यास टाळाटाळ करत होते आणि त्यांना पुण्यात काम करू न देण्याच्या धमक्या देत होते. ज्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझा किंवा माझ्या पत्नीचा या प्रकरणाशी संबंध नाही, आमची भागीदारी आधीच संपली होती, असा दावा त्यांनी केला आहे. आता शेख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने आता या तपासाला वेग येण्याची शक्यता असून धंगेकर पती- पत्नीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनीही 14 जणांच्या अटकेसाठी दोन पथकांची स्थापना केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com