Kolhapur News: वस्तादालाच डावललं! मुश्रीफांचा फोटो न छापण्यामागे भैया मानेंचे बंड की मुश्रीफांचीच 'मूकसमंती'?

Bhaiya Mane Pune Graduate Constituency Election : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय नाट्य! भैया मानेंच्या प्रचार पत्रकावरून मंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो गायब झाल्याने चर्चांना उधाण.
Bhaiya Mane Pune Graduate Constituency Election
Bhaiya Mane Pune Graduate Constituency Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Constituency : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीवरून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धांदल उडाली आहे. महाविकास आघाडी सध्या वेट अँण्ड वॉच च्या भूमिकेत असून महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये चुरस लागली आहे.

अशातच पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली चुरस वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अद्याप जागा वाटप निश्चित झाले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय भैया माने यांनी थेट मैदानात शड्डू चुकला आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्याकडून भैय्या माने यांच्यासाठी उमेदवारीची प्रयत्न सुरू असताना थेट भैय्या माने यांनीच प्रचार पत्रकावर मुश्रीफ यांचाच फोटो डावलल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भैय्या माने हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

सध्या महायुतीमध्ये पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघामध्ये भाजपकडून शरद लाड हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैया माने यांचा उमेदवारीवर दावा आहे. सध्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच भाजपकडून शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Bhaiya Mane Pune Graduate Constituency Election
Manoj Jarange Patil : अखेर 'ती' डिफेंडर गाडी मनोज जरांगेंनी परत पाठवली! नेमकं काय घडलं?

महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये ही जागा कोणाला जाणार यावर अद्याप चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

एका बाजूला असे चित्र असताना दुसरीकडे मात्र मंत्री मुश्रीफ यांचे खंदे समर्थक असलेल्या भय्या माने यांना मंत्री मुश्रीफ यांचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे. अद्याप जागावाटप निश्चित नसताना प्रचार पत्रकावर राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांचाच फोटो देण्यात आलेला आहे.

Bhaiya Mane Pune Graduate Constituency Election
RTE Admission: नामांकित शाळेच्या RTE प्रवेशासाठी ‘खोटा पत्ता’; 14 पालकांवर गुन्हा

मंत्री मुश्रीफ यांच्या साम दाम दंड भेद या सर्वत्र राजकारणात भैया माने यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत भैय्या माने यांनी मंत्री मुश्रीफ यांचा फोटो का डावलला असेल? या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांचाच फोटो माने यांनी डावलल्याने ते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत की काय? अशी चर्चा आता जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

जर मंत्री मुश्रीफ यांचा फोटो पत्रकावर नसेल तर पुणे पदवीधरची ही जागा भाजपकडे गेली असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या संमतीनेच हा फोटो दावलला की काय? शिवाय बंडखोरी करण्यामागे मुश्रीफ यांची संमती आहे की काय? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com