

पुण्यातील लोहगाव परिसरातील बेकायदेशीर RMC प्लांटवर महापालिकेने धडक कारवाई करत तो जमीनदोस्त केला.
धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
कारवाईदरम्यान नगरसेविकेच्या पतीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Pune News : लोहगाव येथील बेकायदेशीर आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर भाजप नगरसेविकेच्या पतीने अंगावर धावून जाऊन गोंधळ घातला. महापालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी नगरसेविकेच्या पतीला ताब्यात घेऊन पिंजऱ्यात बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर महापालिकेने प्लांट पूर्णपणे जमीनदोस्त केला.
पुण्यात बेकायदेशीर आरएमसी प्लांट्समुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘गुदमरतोय श्वास’ मालिकेत आरएमसी प्लांट्समुळे निर्माण होणाऱ्या धुळीची पोलखोल केली होती. दर तासाला शहरात ६ टन इतक्या प्रचंड प्रमाणात सिमेंट मिसळत असल्याचे उघडकीस आले होते.
यानंतर महापालिकेने कारवाईला वेग दिला. आज सकाळी सहाच्या सुमारास महापालिकेचे पथक लोहगाव येथील आरएमसी प्लांटवर कारवाईसाठी दाखल झाले. ही माहिती मिळताच भाजप नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अधिकाऱ्यां-कर्मचाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. प्रीतम खांदवे अंगावर धावून गेल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना ताब्यात घेत पिंजऱ्यात बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर उरलेली कारवाई पूर्ण करून प्लांट पाडण्यात आला.
याबाबत प्रीतम खांदवे यांनी सांगितले, गेल्या दोन महिन्यांपासून हा प्लांट सील होता. कोणतीही नोटीस न देता मध्यरात्री दोन वाजता कारवाई सुरू केली. मी फक्त कागदपत्रांची विचारणा केली. तेव्हा महापालिकेचे कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले. मी अंगावर गेलो नव्हतो.
तर महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपयुक्त सोमनाथ बनकर म्हणाले, लोहगाव येथे कारवाई करताना प्रीतम खांदवे कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पिंजऱ्यात बसवून पोलिस ठाण्यात नेले. महापालिकेने हा प्लांट पूर्णपणे पाडून टाकला आहे.
1. कारवाई कुठे करण्यात आली?
पुण्यातील लोहगाव परिसरातील बेकायदेशीर RMC प्लांटवर कारवाई करण्यात आली.
2. कारवाईचे कारण काय होते?
धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या.
3. या प्रकरणात कोणाला ताब्यात घेण्यात आले?
भाजप नगरसेविकेच्या पतीला कारवाईत अडथळा आणल्यामुळे ताब्यात घेण्यात आले.
4. महापालिकेने काय कारवाई केली?
महापालिकेने प्लांट पूर्णपणे जमीनदोस्त केला.
5. या घटनेचा नागरिकांवर काय परिणाम होईल?
धूळ प्रदूषण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.