Pune Metro : पुणेकरांना दिवाळीचे ‘मेट्रो गिफ्ट’! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त ठरला; पुढच्या महिन्यात होणार उद्घाटन

Hinjawadi–Shivajinagar Metro Launch Date Announced : अखेर आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली असून हिंजवडी मेट्रो सुरू होणार आहे.
Pune Metro
Pune MetroSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Metro Update : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. दिवाळीपूर्वी ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबरला ऑनलाइन पद्धतीने या सेवेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच कार्यक्रमात नळ स्टॉप–वारजे–माणिकबाग, खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक आणि रामवाडी–वाघोली या मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या मेट्रो सेवेची पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांना मोठी प्रतीक्षा होती. दरम्यान आता या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलै रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली. त्या प्रमाणे आता माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) स्थानकादरम्यानच्या १२ स्थानकांवर मेट्रो धावणार आहे.

आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण झाले असून या स्थानकांची तपासणीही करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये या पाच स्थानकांवरील प्रवासी सेवेलाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या संपूर्ण मार्गावर सेवा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Pune Metro
Pune Metro: मोठी बातमी: पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख ठरली? मोदींच्या हस्ते ३ नोव्हेंबरला शुभारंभाची चर्चा; १७ स्थानकांना हिरवा झेंडा!

दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सेवेच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारला माहिती दिली असून तसे पत्र पाठवले होते. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन होते. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबरमध्ये झाल्याने आचारसंहिता लागू झाल्याने ते शक्य झाले नाही. आचारसंहिता २७ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

यामुळे ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारचे होते. पण हा दौरा स्थगित झाल्याने आता मोदी ऑनलाइन पद्धतीने मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बालेवाडी येथे होणार आहे.

Pune Metro
Pune Metro : पुण्याच्या आयटी हबला मोठा दिलासा! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला CMRS चा ‘ग्रीन सिग्नल’, 15 दिवसांत तयारी पूर्ण

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील १७ स्थानकांवरील प्रवासी सेवेला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्गावरील उर्वरित सहा स्थानकांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षी या मार्गावरील सर्व स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com