Kolhapur Politics : बिद्रीचा वांदा म्हणूनच के. पी. पाटील म्हणतात 'एकच वादा...अजितदादा…?'

K. P. Patil With Ajit Pawar : राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांचा अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
K. P. Patil -Ajit Pawar
K. P. Patil -Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊनही आपली भूमिका तळ्यात मळ्यात ठेवणारे राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत राहण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावाला झुगारून के. पी. पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. बिद्री कारखान्याच्या वांद्यात आपले पितळ उघडे पडेल? या भीतीने ते अजित पवारांसोबत गेले असावेत, अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. कारण बिद्री कारखान्याचे लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली होती. (Radhanagri's Former MLA K. P. Patil's decision to go with Ajit Pawar group)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १० सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या तपोवन मैदान येथे सभा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्या बैठकीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

K. P. Patil -Ajit Pawar
Modi Will Contest Lok Sabha In Pune : गुजरात, यूपीनंतर मोदी लोकसभा लढविणार महाराष्ट्रात?; काँग्रेसच्या 'या' आमदाराने दिले आव्हान

मी पहिल्यापासून अजित पवार यांच्याबरोबर होतो आणि आहे. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना सोडून क्षणभरही बाजूला गेलो नाही. बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्प काही कारणांनी थांबला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे काम करणं क्रमप्राप्त आहे, असे के पी यांनी म्हटले.

K. P. Patil -Ajit Pawar
Ajit Pawar Speech: चंद्र-सूर्य असेपर्यंत कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही;अजित पवारांनी ठणकावले

बिद्रीचा कारखान्याचा प्रोजेक्ट हा वैयक्तिक नाही. तो ६० हजार सभासदांचा आहे. डिस्टिलरी प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. परवानगी मिळाली नसती, तर बँक पाच रुपये तरी कर्ज देईल का? असा सवालही के. पी. पाटील यांनी उपस्थित केला.

K. P. Patil -Ajit Pawar
Ajit Pawar On One Nation-One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’चे अजित पवारांकडून स्वागत; महायुतीच्या सभेत पाठिंब्याची घोषणा

कार्यकर्त्यांच्या दबावाखातर 'के पी' थांबले होते

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माजी आमदार के. पी. पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते. के. पी. पाटील यांनी अजितदादा यांना पाठिंबा देऊन आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात आपण शरद पवार यांच्या सोबत राहावे, असा दबाव कार्यकर्त्यांनी टाकला. त्यावर के. पी. पाटील यांनी भूमिका जाहीर न करताच ती गुलदस्त्यात ठेवली होती. पण आज त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com