Ajit Pawar On One Nation-One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’चे अजित पवारांकडून स्वागत; महायुतीच्या सभेत पाठिंब्याची घोषणा

महायुतीच्या नेत्यांविरोधात अनावश्यक टिपण्ण्या टाळल्या पाहिजेत. गैरसमज निर्माण झाले तर वरिष्ठांशी बोलले पाहिजे. आम्ही त्यातून मार्ग काढू.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ‘वन नेशन वन इलेक्शन’संदर्भात बातम्या येत आहेत. जीएसटीसारखा सुरुवातीला विरोध होईल. पण, यापूर्वीसुद्धा एकत्रित निवडणूक लागल्या आहेत. त्यातून पैसे वाचतात. सारख्या निवडणूक असल्या की विकासकामे खुंटतात. निवडणुकांवर वारेमाप खर्च होतो, त्यामुळे ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही भूमिकाही लोक स्वीकारतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या सभेत जाहीर केले. (Ajit Pawar welcomes 'One Nation One Election'; Declaration of support at Mahayuti meeting)

गेल्या दोन दिवसांपासून देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ यासंदर्भात संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. त्याबाबत अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी सरकारने एक विशेष अधिवेशनही बोलावले आहे. त्यातही या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ajit Pawar
Mahayuti Meeting : आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार;तटकरेंनी महायुतीच्या बैठकीतून रणशिंग फुंकले

महायुतीच्या मुंबईत झालेल्या सभेत अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी आणि राज्याच्या हितासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक राहावं. पण आक्रमक राहताना एकमेकांच्या विरोधातील अनावश्यक संघर्ष टाळला पाहिजे. महायुतीच्या नेत्यांविरोधात अनावश्यक टिपण्ण्या टाळल्या पाहिजेत. गैरसमज निर्माण झाले तर वरिष्ठांशी बोलले पाहिजे. आम्ही त्यातून मार्ग काढू. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. महायुतीच्या कार्याकर्त्यांच्या पाठीशी सरकारची ताकद उभी केली जाईल. पण, पदाधिकाऱ्यांनाही त्रास देता कामा नये.

Ajit Pawar
Ajit Pawar Speech: चंद्र-सूर्य असेपर्यंत कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही;अजित पवारांनी ठणकावले

महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय घेण्यात येईल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमीपणा येणार नाही, असं कोणतंही काम आमच्याकडून होणार नाही. राज्यातील ४८ जागांचा निर्णय राज्यस्तरावर होईल. वेळ पडली तर राष्ट्रीय पातळीवर जावे लागेल. पण, तुम्हाला लोक भडकवतील. पण त्यांना सांगा की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो कोणी उमेदवार देतील, त्यांना निवडून आणण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com