Solapur Politic's : गणेश विसर्जनानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठा धमाका; दोन माजी आमदारांसह लिंगायत नेता भाजपच्या वाटेवर!

Congress-NCP Leader Path on BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपची स्वबळाची सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून इनकमिंगवर जोर देण्यात येत आहे,
 Dilip Mane-Rajan Patil-Dharmraj Kadadi
Dilip Mane-Rajan Patil-Dharmraj KadadiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 September : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गणेश विसर्जनानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तीन मोठे नेते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यामध्ये दोन माजी आमदारांसह लिंगायत समाजाच्या मोठ्या नेत्याचा समावेश आहे, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात आगामी काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख, कारखान्याचे वरिष्ठ संचालक धर्मराज काडादी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि काडादी यांच्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.

राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठीही कल्याणशेट्टी यांनी विशेष लक्ष घातल्याचे सांगितले जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यावेळी या दोन्ही प्रवेशाबाबत या आमदारांची फडवणीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सोलापूर शहराच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण नेते असलेले धर्मराज काडादी हे राज्यातील लिंगायत समाजात प्राबल्य राखून आहेत. कर्नाटकातील भाजपचे नेते तथा रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हे धर्मराज काडादी यांचे व्याही आहेत. व्ही. सोमण्णा यांच्या माध्यमातून धर्मराज काडादी यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे, त्यामुळे गणेशोत्सवानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठा धमाका होण्याची चिन्हे आहेत.

 Dilip Mane-Rajan Patil-Dharmraj Kadadi
Ajit Pawar : अजितदादांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाने तातडीने गाठले कुर्डू गाव अन्‌...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगली आहे. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासोबत युती करून पॅनेल उभा केले होते, त्यांच्या पॅनेलला भाजपचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी एकत्र येत विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणशेट्टी यांना सर्व अधिकार दिले होते.

कल्याणशेट्टी यांनी दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या साथीने बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवली होती. निवडणुकीनंतर दिलीप माने यांच्यासाठी पहिल्यांदा बाजार समितीच्या सभापतिपदाचा मान देण्यात आलेला आहे. माने यांना सभापती केल्यापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. माने यांच्या भाजपप्रवेशासाठी त्यांचे काँग्रेसमधील पूर्वाश्रमीचे मित्र आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपची स्वबळाची सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून इनकमिंगवर जोर देण्यात येत आहे, त्यामुळे समाजात वर्चस्व राखून असणाऱ्या नेत्यांना सोबत घेण्याचे धोरण सध्या भाजपकडून अवलंबले जात असल्याचे सोलापूरमधील राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे.

 Dilip Mane-Rajan Patil-Dharmraj Kadadi
Ajit Pawar Viral Video : अजितदादांच्या बचावासाठी उतरले खंदे समर्थक; म्हणाले, ‘कोणाचा तरी फोन आला म्हणून त्या...’

कारखाना, संस्थांसाठी सत्तेसोबत जावे लागणार : धर्मराज काडादी

भाजप प्रवेशाबाबत सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी म्हणाले, सत्ता आणि राजकारणात मला कोणताही रस नाही. मात्र, साखर कारखाने आणि इतर संस्था सरकारच्या मदतीअभावी अडचणीत येऊ शकतात. त्या अडचणी सोडवायच्या असतील तर सत्तेसोबत जावे लागणार आहे. पण, सत्तेतील कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तशी कोणाशीही चर्चा झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com