Sugarcane FRP Issue : राजू शेट्टी आक्रमक; ‘मुश्रीफ हे कारखानदारांचे पालक, आता जे काही होईल ते मैदानातच...’

Raju Shetti Warning to Government : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीनेही कारखानदार मागील 400 रुपये देऊ शकत नसल्याचा अहवाल दिला आहे.
Satej Patil-Hasan Mushrif-Raju Shetti
Satej Patil-Hasan Mushrif-Raju ShettiSarkarnama

Kolhapur News : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे नव्हे; तर कारखानदारांची पालक आहेत. मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखानदार एकत्र आले आहेत. या दोघांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत; पण आता ‘शीर तुटो वा पारंबी’ स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटणार नाही. एक तपापूर्वी जे घडलं तेच आताच्या आंदोलनात घडणार, येत्या गुरुवारी (ता. 23 नोव्हेंबर) राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Raju Shetti Aggressive over sugarcane FRP : Serious allegations made against Mushrif, Satej Patil)

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला 400 व यंदा प्रतिटन 3500 रुपये दर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यातील बैठक तीन वेळा निष्फळ ठरली. त्यावर तोडगा काढण्यासाठी मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीनेही कारखानदार मागील 400 रुपये देऊ शकत नसल्याचा अहवाल दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलन आरपारची लढाई असल्याचे जाहीर केले आहे. यंदा ऊसगाळप नगण्य आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनाला ऊस उत्पादकांचा पाठिंबा आहे. मात्र, कारखानदारांकडून शेतकऱ्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Satej Patil-Hasan Mushrif-Raju Shetti
Dhangar Reservation : धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; एसटीत समावेशासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घाई गडबडीने अहवाल दिला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा प्रशासनावर दबाव आहे. कारखाने पैसे देऊ शकत नसल्याचा अहवाल त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिला आहे. समिती होती का? कारखानदारांचा बनाव होता, अशा शब्दांत शेट्टी यांनी प्रशासन व पालकमंत्री मुश्रीफ यांना सुनावले.

जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीचा हिशेब काढला. पालकमंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसायची होती. मुश्रीफ व सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. आता जे काही व्हायचं ते मैदानातच होईल, आता आम्ही मागे हटणार नाही. आता निकराची लढाई सुरू झाली आहे, रविवारी होणारा चक्काजाम आता गुरुवारी (ता. 23 नोव्हेंबर) होईल, त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil-Hasan Mushrif-Raju Shetti
Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांचा भुजबळांच्या आडून भाजपवर निशाणा; ‘जामिनावर असल्याची आठवण करून दिली ’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com