राजेश क्षीरसागरांनी 500 एकरचा लावला जावईशोध, राजू शेट्टी करणार सातबारा नावावर

Raju Shetti On Rajesh Kshirsagar over Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रान उठवणाऱ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्यावर आरोप देखील केले आहेत.
Raju Shetti And Rajesh Kshirsagar on Shaktipeeth Highway
Raju Shetti And Rajesh Kshirsagar on Shaktipeeth Highwaysarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनावरून राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना थेट ५०० एकर जमीन पुराव्यासह बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान दिले आहे.

  2. "ती सर्व जमीन त्यांच्या नावावर करतो" असं म्हणत शेट्टींनी तीव्र राजकीय प्रतिक्रिया नोंदवली आहे.

  3. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बिंदू चौकात प्रत्यक्ष भेट घेऊन सामना करण्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर वाहवत गेले आहेत. माझी 500 एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. सदर 500 एकराचे सात बारे घेऊन राजेश क्षीरसागर यांनी येत्या 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता स्वत: बिंदू चौकात हजर रहावे. मी देखील स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहतो. ती सर्व 500 एकर जमीन मी त्यांच्या नावावर करतो, अशा शब्दात शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करणाऱ्या क्षीरसागर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आव्हान दिले आहे.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप प्रसार माध्यमातून केला. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, मी गेल्या 25 वर्षात सार्वजनिक क्षेत्रात पाच निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत मी माझ्या चल व अचल संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्या विवरणपत्रा व्यतिरिक्त राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे.

Raju Shetti And Rajesh Kshirsagar on Shaktipeeth Highway
Raju Shetti News: राजू शेट्टींना वेगळाच संशय; म्हणाले, कोकाटेंकडे अजितदादा अन् फडणवीसांबाबत गुपित...

राजू शेट्टी हे दोन दिवस दौऱ्यानिम्मीत्ताने जिल्ह्याबाहेर आहेत. येत्या 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता राजू शेट्टी स्वत: बिंदू चौकात हजर राहणार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे. ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार आहेत.

जर राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दुपारी 12 वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी, असे आव्हान शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना केले आहे.

Raju Shetti And Rajesh Kshirsagar on Shaktipeeth Highway
Raju Shetti : राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक : ‘शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमता; उद्योजकांचे कर्ज माफ करताना कुठली समिती नेमली होती?

राजू शेट्टी यांनी नेमकं काय आव्हान दिलं आहे?
– त्यांनी राजेश क्षीरसागर यांना ५०० एकर जमीन असल्याचा पुरावा घेऊन बिंदू चौकात यायला सांगितलं आहे.

2. हे प्रकरण कशामुळे सुरू झालं?
– शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात क्षीरसागर यांनी राजू शेट्टींवर जमीन मालकीबाबत टिप्पणी केली होती.

3. बिंदू चौकात काय होणार आहे?
– २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शेट्टी व क्षीरसागर यांच्यात प्रत्यक्ष भेटीची शक्यता आहे.

4. ही वादग्रस्त जमीन कोणत्या गावातील आहे?
– सध्यातरी त्या जमिनीचे गाव किंवा गावनंबर स्पष्ट करण्यात आलेले नाही, पण शेट्टी त्याचा सातबारा उघड करण्यास तयार आहेत.

5. शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे?
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यामध्ये सरकारच्या भूमिकेवर टीका करत निष्पक्षता मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com