Kolhapur : रामराज्य पाहिजे की रावणराज्य; कागलच्या जनतेने ठरवावे....नवोदिता घाटगे

भाजपचे BJP जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे Samarjeet Ghatge यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे Navodita Ghatge यांचा एकेरी उल्लेख झाल्यानंतर संतप्त घाटगे समर्थक महिलांनी आज कागलमध्ये Kagal मोर्चा Morcha काढला.
Navodita Ghatge
Navodita Ghatge sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : मला पाडणारा जन्माला यायचा आहे या हसन मुश्रीफांच्या आव्हानाला समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी रावणालाही वाटत होतं मला कोणी मारू शकणार नाही, कागलच्या जनतेनं ठरवायचं आहे, रामराज्य पाहिजे का रावणराज्य असा टोला लगावला आहे.

कागलमधील एका सभेत हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांचा एकेरी उल्लेख झाल्यानंतर संतप्त घाटगे समर्थक महिलांनी आज कागलमध्ये मोर्चा काढला. या मोर्च्यात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित कार्यकर्त्याचा पुतळा जाळण्यात आला.

Navodita Ghatge
कागल मतदारसंघात भाजपची मुसंडी; समरजितसिंह घाटगे यांचा दावा

यावेळी हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी आपण महिलांचा कायम आदर करत असल्याचे सांगितले तर समरजीत घाटगे याचे राजकारण असल्याचा मुश्रीफ यांनी आरोप केला. त्याचबरोबर मला पाडणारा अजून जन्मायचा आहे, असा टोला हाणला.

Navodita Ghatge
हसन मुश्रीफ यांनी नाक दाबल्याने धुळ्याचे भाजप नेते कासावीस!

यावर नवोदिता घाटगे यांनी हसन मुश्रीफ जे सांगतात तेच कार्यकर्ते बोलतात. गेल्या पाच वर्षांपासून अशी वक्तव्य केली जात आहेत, यामुळे महिला संतप्त होऊन रस्त्यावर आल्या. मुश्रीफ यांच्यावर मी कधीही बोलत नाही. त्यांच्यावर टीका करत नाही. त्यामुळे मला बोलण्याची गरज नव्हती, आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणार, असा इशारा दिला.

Navodita Ghatge
Kolhapur : हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार... समरजित घाटगे

समरजीतसिंह घाटगे यांना दिलेल्या आव्हानाबाबत त्या म्हणाल्या, रावणालाही वाटत होतं मला कोण मारू शकत नाही, पण कागलच्या जनतेनं ठरवायचं तुम्हाला रामराज्य पाहिजे का रावणराज्य, असे आव्हान त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com