Ram Satpute Vs Uttam Jankar :राम सातपुतेंनी स्वीकारले जानकरांचे चॅलेंज; ‘बॅलेट’च नाही, तर हात वर करूनही निवडणूक घ्या...’

Markadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडीत महायुतीचीही लवकरच सभा होईल, ती पवारांनी लाईव्ह बघावी. पवार आल्यानंतर मोहिते पाटलांच्या गुंडांनी मारकडवाडीतील लोकांना धमकावले. आगामी काळात असा प्रकार घडला तर आम्ही सोडणार नाही.
Ram Satpute - Uttam Jankar
Ram Satpute - Uttam Jankar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 December : मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी दिलेले चॅलेंज मी स्वीकारतो. हिम्मत असेल तर उद्या जानकरांनी राजीनामा द्यावा. परवा निवडणुकीला समोरे जाण्याची आमची तयारी आहे. त्यांनी ईव्हीएम, बॅलेट किंवा हात वर करूनही निवडणूक घेतली तरी माझी तयारी आहे. पण, जानकरांनी अगोदर राजीनामा द्यावा, असे प्रतिआव्हान भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी जानकर आणि मोहिते पाटील यांना दिले.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार विद्या चव्हाण यांंनी मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्याला भाजपचे राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचे चॅलेंज मी स्वीकारतो. उत्तम जानकरांनी अगोदर राजीनामा द्यावा. प्रशासनाने निवडणूक घेतली तर त्यांना बॅलेटच काय तर त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे, त्या भाषेत निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे.

मारकडवाडीत महायुतीचीही लवकरच सभा होईल, ती पवारांनी लाईव्ह बघावी. पवार आल्यानंतर मोहिते पाटलांच्या गुंडांनी मारकडवाडीतील लोकांना धमकावले. आगामी काळात असा प्रकार घडला तर आम्ही सोडणार नाही. आम्ही फांद्या हाणणार नाही, तर खोडावर घाव घालू, असा इशाराही राम सातपुते (Ram Satpute) यांनी दिला.

सातपुते म्हणाले, मोहिते पाटलांच्या पाळीव गुंडांनी मारकवाडीतील लोकांना ज्या धमक्या देण्यात आल्या, तसेच त्यांनी जी भाषा वापरली त्याचा मी निषेध करतो. जिंकले तर लोकशाही जिंकली आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं, असा प्रत्येक निवडणुकीनंतर पवारांचा आणि त्यांच्या टोळीचा एक कार्यक्रम ठरलेला असतो. हा प्रकार गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पाहतोय. मोहिते पाटलांना जर संघर्षच पाहायचा असेल तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता करायला तयार आहे.

Ram Satpute - Uttam Jankar
Pawar Vs Bawankule : पवारसाहेब, मारकडवाडी कोणाची मक्तेदारी नाही, ही बघा आकडेवारी; बावनकुळेंनी सुनावले

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या लोकांनी पैसे वाटप करून आम्हाला निवडणुकीत पराभूत केले आहे, येत्या काळात मोहिते पाटील यांना उत्तर देण्याचे काम नक्कीच केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, उत्तम जानकर हा लबाड माणूस आहेत, हे जयंत पाटील यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असा त्यांचा ठरवून कार्यक्रम सुरू आहे, असेही भाष्य त्यांनी केले आहे.

मी तीनशे कोटी रुपयांचा कारखाना काढला, राम सातपुतेंनी पिठाची गिरणी तरी काढावी. हव तर मी त्यांना कारखान्यावर कामाला ठेवतो, हे उत्तम जानकर यांचे विधान म्हणजे हा मोहिते पाटलांचा माज आहे. उत्तम जानकर हे प्यादं आहे,तर रणजितसिंह मोहिते पाटील हे सर्वांचे मास्टर माईंड आहेत, असा आरोप सातपुते यांनी केला.

Ram Satpute - Uttam Jankar
Jayant Patil : जयंत पाटलांचे ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’; पोस्टल मतांचा ट्रेंड सांगत महायुतीच्या विजयाची केली पोलखोल!

मारकडवाडी हे गाव मोहिते पाटील यांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील गाव आहे. मागच्या तीन निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या विरोधकांना मते मिळालेली आहेत. मारकडवाडी प्रकरणाचे खरे मास्टर माईंड हे रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. वडिल एका स्टेजवर, मुलगा दुसऱ्या स्टेजवर असं थोडं चालतं. त्यांनी मनाची नाही तर जनाची थोडी जरी असले तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांनीही नक्कीच मारकवाडीत यावं. पण येथील नागरिकांना कोणी धमक्या दिल्या तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराही सातपुते यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com