Satpute Attack Mohite Patil : सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘ती लाचार प्रवृत्ती...त्यांची गद्दारी पक्षाच्या लक्षात आलीय’

BJP Political News : भारतीय जनता पक्षातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विषय संपलेला आहे. एखाद्याला हाकालपट्टी करून कशाला मोठं करायचं, हा कदाचित पक्षाचा विचार असेल.
Ranjitsinh Mohite Patil-Ram Satpute
Ranjitsinh Mohite Patil-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 May : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारवाईसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी मोहिते पाटील यांनी मान खाली घातली होती. यावर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘भाजपमधून रणजितसिंह मोहिते पाटील हा विषय संपला असून ती लाचार प्रवृत्ती आहे,’ अशा शब्दांत सातपुते यांनी मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला.

राम सातपुते म्हणाले, भारतीय जनता पक्षातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांचा विषय संपलेला आहे. एखाद्याला हाकालपट्टी करून कशाला मोठं करायचं, हा कदाचित पक्षाचा विचार असेल. पक्षात अनुशासन समिती असते, त्यांनी तो अहवाल केंद्रीय अनुशासन समितीकडे पाठवला, असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिवावर मोहिते पाटील यांना आमदारकी भेटली होती. त्यांची आमदारकी काढायची असेल किंवा त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर त्यासंदर्भात एक अनुशासन समिती असते. त्यानुसा मोहिते पाटलांवरील कारवाईचा विषय केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आलेला आहे. पण, त्यांनी भाजपसाठी काय दिलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे. ते कशा पद्धतीने गद्दारी करू शकतात, हे पक्षाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे पक्ष येत्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करेल आणि ती केली पाहिजे, अशी माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही राम सातपुते (Ram Satpute) यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार सातपुते म्हणाले, यापूर्वी आम्ही म्हणजे असे, आम्ही म्हणजे तसे, अशी त्यांची बोलायची पद्धत होती. मात्र, त्यांच्या नाकाखालून आम्ही 1 लाख 8 हजार मते मिळविली. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेला माहिती आहे की, कामाचा माणूस कोण आहे. येत्या काळात संघर्ष करत राहू. राम सातपुते हा एखाद्या पराभवाने किंवा दुःख कुरवळत बसणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Ram Satpute
Gokul Milk : 'गोकुळ'च्या राजकारणात प्रचंड 'धक्कादायक' घडामोडी; हसन मुश्रीफांचे चिरंजीव नवे होणार अध्यक्ष

रणजितसिंह मोहिते पाटील हे पार्टीच्या किंवा नेत्यांच्या बैठकीला येतात. पण ती एक लाचार प्रवृती आहे. हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याने पाहिले आहे, त्यामुळे अशा प्रवृत्ती आणि विकृतीच्या विरोधात हा राम सातपुते हा लढा देत राहील. मुळात मी भारतीय जनता पक्षाचा सैनिक आहे. माझी ताकद काय आहे, हे मी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात विरोधी उमेदवाराला ७० हजार मतांचे लीड होते. ते विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांनी ते तोडून सहा हजारांवर आणून ठेवले, त्यामुळे माळशिरस तालुका हा भाजपच्या विराचारांचा आहे. यापुढे आम्ही लढू आणि संघर्ष करत राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मान खाली घालण्याच्या कृतीवर मी बोलणार नाही. मुळात ती लाचार प्रवृत्ती आहे, त्या विषयावर काय बोलणार, असा सवाल सातपुते यांनी केला. माळशिरस तालुक्यात आम्ही लढणारी माणसं आहोत आणि आम्ही लढत राहू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही भाजप आणि महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. विधानसभेला ज्या प्रमाणे आम्ही एकजुटीने लढलो, त्याच पद्धतीने आगामी निवडणुकाही आम्ही लढत राहू, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

Ranjitsinh Mohite Patil-Ram Satpute
Eknath Khadse : शरद पवार गेले तर मीही...! खडसे यांनी घातली अजित पवार गटात जाण्यास अट

माळशिरस तालुक्यातून भाजपचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून आणू. तसेच, माळशिरस पंचायत समितीवर आम्ही भाजपचा झेंडा फडकावू, असा विश्वासही सातपुते यांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com