Sangli News : राज्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढत असून यावर पोलिस प्रशासन किंवा सरकारकडून तातडीची कारवाई होताना दिस नाही, अशी नाराजी भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने व्यक्त केली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये दलित असुरक्षित असणे योग्य नसल्याचे ताशेरे देखील ओढले आहेत. एकीकडे महायुतीवर ताशेरे ओढले असतानाही दुसरीकडे केंद्रीय मंत्र्याने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारबाबत मात्र समाधान व्यक्त केले आहे. तसेच मोदी हे संविधानाचा आदर करणारे नेते आहेत, असे सांगितले आहे. यामुळे सध्या राज्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यात दलितांवर होणारे अन्याय-अत्याचार यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार असतानाही दलितांवर अन्याय-अत्याचार होत असून या प्रकरणात आरोपींवर तातडीने कारवाई होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये दलित असुरक्षित असणे योग्य नाही नसल्याचे खडे बोल सुनावले आहेत.
ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश बारशिंग, राजेंद्र खरात, पोपटराव कांबळे, श्वेतपद्म कांबळे, संजय कांबळे, आण्णा वायदंडे, अरूण आठवले, छायाताई सरवदे उपस्थित होते.
यावेळी राज्यात दलितांवर अन्याय अत्याचार होत असतानाही पोलिस प्रशासन आणि सरकारकडून होणाऱ्या कारवाईवरून आठवले यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आंतरजातीय विवाह केल्याने भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याचा खून झाला. पण अद्याप आरोपींना अटक होत नाही. केवळ एकाच आरोपीस अटक करण्यात आली आहे.
परभणी येथे ही आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीवर पोलिसींनी हात सोडला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोषींवरही अद्यापल कारवाई होत नाही. वास्तविक सूर्यवंशी यांचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आहे हे स्पष्ट असताना कारवाईस टाळाटाळ होत आहे. यामुळे राज्यातील दलीत समाज स्वतःला असुरक्षित समजू लागल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात असे प्रकार होणे योग्य वाटत नाहीत. राज्यातील पोलिस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का? याचा जाब फडणवीस यांना भेटून विचारणार असून पिडीत दलीतांना न्याय मिळणार आहे की नाही? हे देखील विचारणार असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. एकीकडे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडतात, मात्र दलितांवर अत्याचार केलेले आरोपी सापडत नाहीत हा विरोधाभास का? असाही सवाल आठवले यांनी सरकारला विचारला आहे.
युध्द नको, बुध्द हवा, असे पंतप्रधान मोंदींनी सांगितले असून बौद्ध धर्माने जगाला विश्वशांतीचा संदेश दिला आहे. त्यामुळे 2 मार्च रोजी नाशिक काळाराम मंदीर सत्याग्रह दिवसाच्या निमीत्ताने नाशिक येथे आंतरराष्ट्रीय बौध्द समूह परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे. या परिषदेला श्रीलंका, जपान, कॅनडा, व्हीएतनाम, जर्मनी, थायलंड आदी 10 ते 12 देशांतून 30 ते 40 हजार लोक या परिषदेला उपस्थित राहतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.